शहराच्या विकासात बाबूभाई ठक्कर यांचा मोलाचा योगदान-सूर्यकांता पाटील
नांदेड-दिनांक .८ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून नांदेड शहराच्या विकासातबाबुभाई ठक्कर यांनी मोलाची कामगिरी बजावली, त्यांनी या क्षेत्रात केलेलं काम पत्रकारांच्या नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी केले.
मराठवाड्यातील जेष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबुभाई ठक्कर यांच्या स्मरणात गिरीश भाई,रवी भाई, हाय हरीश भाई ठक्कर व कुटुंबीयांनी हा सन्मान सोहळा आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती सूर्यकांता ताई पाटील या होत्या तर विधान परिषदेचे गटनेचे आमदार हेमंत पाटील आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंदराव बोंडारकर आमदार बाबुराव कदम दैनिक प्रजावाणीचे मुख्य संपादक संतनु डोईफोडे गोवर्धन बियाणी विजय हो करणे उमाकांत जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती
याप्रसंगी दैनिक प्रजावाणीचे मुख्य संपादक संतनु डोईफोडे यांनी बदलती काळानुरूप नुसार पत्रकारिता यावर मत मांडले, कै. सुधाकर डोईफोडे कै. रामेश्वर बियाणी यांचा मराठवाड्याच्या विकासातील योगदान भावी पिढीसाठी जतन करणे आवश्यक आहे असे सांगून नेगेटिव्ह रोल च्या वापरातून नवीन तंत्रज्ञानाद्वारे फोटोग्राफी व्हिडिओ ग्राफी जीवंत ठेवण्याचे तंत्र सोधणे काळाची गरज आहे असे ते म्हणाले विधान परिषदेचे गटनेचे आमदार हेमंत पाटील हे महाविद्यालयीन काळातील आठवणीत रममाण झाले मान झाले महाविद्यालयात हॉल तिकिटासाठी पासपोर्ट आवश्यक असायचा आता दररोज वर्तमानपत्रात फोटो येतो त्यामुळे पूर्वी फोटोचे महत्त्व व आजच्या काळातील वर्तमानपत्रातील फोटोची गरज यावर भाषण केले सामाजिक कार्यकर्ते वसंत मैय्या यांनीही यावेळी फोटो व्हीजन च्या आठवणी आपल्या भाषणातून सांगितल्या, प्रास्ताविकात विजय होकरणे यांनी स्व. बाबुभाई ठक्कर यांच्या माध्यमातून फोटोग्राफी करणारे एक व्यक्ती समाजाला दिसते परंतु त्यामागे संपूर्ण कुटुंबाची महत्त्वाची भूमिका असते असे सांगून या कार्यक्रमाचे महत्त्व व गरज कशी आहे हे सांगितले नांदेड मधील अनेक मान्यवर पत्रकार छायाचित्रकार यांचा स्मृती चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले, ठक्कर कुटुंबियातील तिसरी पिढी चे रतिन ठक्कर यांनी बदलती फोटोग्राफी यावर आपले मत मांडले स्व. बाबुभाई ठक्कर यांच्या व्यक्तिमत्तवावर उपस्थित सर्वांनीच जुन्या आठवणींना उजाळा दिला शेवटी हरीशभाई ठक्कर यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर ब्याळे यांनी केले.
Post Views: 11