नांदेड | प्रतिनिधी
नांदेड येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर या भव्य सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात स्टॉल क्रमांक ३२५ वर SIFRA AI या अत्याधुनिक शैक्षणिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूलचे भव्य सादरीकरण करण्यात आले आहे.
SIFRA AI हे पूर्णतः मोफत शैक्षणिक AI साधन असून, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सुलभ, समजण्यास सोपा आणि डिजिटल पद्धतीने अधिक प्रभावी बनवण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे AI टूल नांदेडमधील Portal Infosys या स्थानिक तंत्रज्ञान संस्थेच्या कुशल टीमने विकसित केले आहे.
या स्टॉलवर विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि तंत्रज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत असून, SIFRA AI कसे काम करते, ते अभ्यासात कशी मदत करते, प्रश्नोत्तरे, संकल्पना समजावून सांगणे, तसेच डिजिटल शिक्षणात AI ची भूमिका याविषयी प्रत्यक्ष डेमोच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.
“शिक्षण सर्वांसाठी सुलभ आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी करणे” हा SIFRA AI चा मुख्य उद्देश असून, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत समान शैक्षणिक संधी पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
हिंद दी चादर या उपक्रमात SIFRA AI चा स्टॉल हे आकर्षणाचे केंद्र ठरत असून, नांदेडमधील स्थानिक स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे. आयोजकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले असून, भविष्यात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना अधिक व्यासपीठ देण्याचा मानस व्यक्त केला आहे.
