वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पासाठी आता शासनाने शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजमापासाठी नोटिसा दिल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा आशा निर्माण झाली आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर चांदूर रेल्वे परिसरातील शेतकऱ्यांनी सिनेमा चौक येथील धर्मशाळेत बैठक घेतली. नगरसेवक हर्षल वाघ यांच्या पुढाकाराने पाटबंधारे विभागाचे अधिकारी मावळे, इंगळकर, थूल आणि जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची माहिती, शेती मोजणी आणि नुकसान भरपाईबद्दल सांगितले. चांदूर रेल्वेतून जाणारा कालवा ५ मीटर खोल आणि ११ मीटर रुंद असेल, जो रस्त्यांसह ८० मीटर जागा व्यापेल. या कालव्यातून फक्त रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठीच पाणी मिळेल, असे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांना बारमाही पाण्याची अपेक्षा होती. शेतकऱ्यांनी कायमस्वरूपी सिंचनाचा लाभ मिळावा अशी मागणी केली.
वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्प पुन्हा चर्चेत, शेतकऱ्यांना जमिनी मोजमापाच्या नोटिसा:चांदूर रेल्वेतील शेतकऱ्यांनी बैठक घेतली; उन्हाळी-रब्बी हंगामासाठी पाणी मिळावे अशी मागणी