पुण्यात विवाहित महिलेची आत्महत्या, प्रियकर अटकेत:प्रेमाच्या जाळ्यात ओढून दागिने मोडले, पतीपासून वेगळे राहण्यास भाग पाडले



प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला ओढून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. महिलेला पतीासून वेगळे राहण्यास भाग पाडून तिचे दागिने मोडण्यात आले. आरोपीच्या त्रासामुळे महिलेने आत्महत्या केली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकाला विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. अभिजित जगदीश शिंदे (वय ३२, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत महिलेचा भाऊ ओंकार काळे (वय ३१) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोमल दीपक शिंदे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित शिंदे याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. महिला विवाहित असल्याची माहिती त्याला होती. महिलेला पतीपसाून वेगळे राहण्यास भाग पाडले. त्यानंतर महिला आरोपीबरोबर राहू लागले. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारू पिऊन तिला त्रास देत होता, तसेच तिच्या चारित्र्याचा संशय घेत होता. त्याने तिला दागिने मोडण्यास भाग पाडले. आरोपीने तिला मारहाण केली होती. त्याच्या त्रासामुळे २२ सप्टेंबर रोजी महिलेने राहत्या घरात दुपारी साडेतीनच्या सुमारास आत्महत्या केली, असे फिर्यादीत सांगितले आहे.आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत तपास करत आहेत. वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवाशाच्या मृत्यू भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जिल्हाधिकारी कार्यालय चौकात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार अंकुश जोशी (वय ३४, रा. गणेश कॉम्प्लेक्स, टिंगरेनगर, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार सुहास मच्छिंद्र तपासे (वय ३७, रा. निंबाळकरनगर,डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्ता, लोहगाव ) जखमी झाले. तपासे यांनी याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार तपासे आणि जोशी हे २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून (बोल्हाईमाता मंदिर चौक) मालधक्का चौकाकडे निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी जोशी हे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार तपासे यांना दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.जोशी आणि तपासे यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच जोशी यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून,पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.पोलीस उपनिरीक्षक एस धुमाळ तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *