मतदान न करणाऱ्यांवर ‘रामबाण उपाय’ची भाषा:आमदार अब्दुल सत्तारांसह निवडणूक अधिकाऱ्यांना सिल्लोड न्यायालयाची नोटीस




सिल्लोड–सोयगाव 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवार असलेले आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रचाराच्या शेवटच्या जाहीर सभेत तालुक्यातील मतदारांना उद्देशून धमकीवजा वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ज्या मतदारांनी आपल्याला मतदान करणार नाही, त्यांची नावे गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळविण्याचे आवाहन करत अशा मतदारांवर “रामबाण उपाय” केला जाईल, अशी भाषा वापरण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. यामध्ये गोळ्या देणे, इंजेक्शन देणे, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा उल्लेख केल्याचा आरोप आहे. या कथित धमकीपूर्ण भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रार फेटाळल्याचा शंकरपेल्लींचा आरोप या कथित धमकीपूर्ण वक्तव्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली यांनी दुसऱ्याच दिवशी सी-विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी श्री. लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचा बचाव करत तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली. काय म्हणाले गणेश शंकरपेल्ली
यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले. मात्र, सुमारे एक वर्ष पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई अथवा निर्णय घेण्यात न आल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयात पार्टी इन पर्सन म्हणून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. अब्दुल सत्तारांचे वक्तव्य काय?
या प्रकरणी सिल्लोड येथील प्रथम न्याय दंडाधिकारी न्यायालयाने आमदार अब्दुल सत्तार, तत्कालीन आचारसंहिता पथक प्रमुख दादराव श्रीपत अहिरे, सिल्लोड निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याबाबत नोटीस बजावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *