Investment Target Over 16 Lakh Crore



महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत आज दावोसकडे (स्वित्झर्लंड) रवाना झाले आहेत. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या (WEF) वार्षिक परिषदेत सहभागी होण्यासाठी

.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ते २३ जानेवारी २०२६ पर्यंत दावोसमध्ये असतील. त्यांच्यासोबत वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही उपस्थित राहणार आहे. मागील वर्षी राज्य सरकारने दावोसमध्ये १६ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) केले होते. त्यापैकी जवळपास ७२ टक्के करार प्रत्यक्षात उतरले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला होता. यंदा हा आकडा पार करून १६ लाख कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीवर राज्य सरकारचा भर असणार आहे.

मुंबईच्या महापौर निवडीसाठी प्रतिक्षा

राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री पुढचे पाच दिवस विदेश दौऱ्यावर असल्याने आणि शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्ये असल्याने, महापौर निवडीची प्रक्रिया आता मुख्यमंत्र्यांच्या पुनरागमनानंतरच म्हणजेच २३ जानेवारीनंतरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.

फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर राऊतांची टीका

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री दावोसमधून गुंतवणूक आणतात असे म्हणतात. ते अनेक वर्षांपासून दावोसला जात आहेत, पण महाराष्ट्र गुंतवणूक काही दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक नगरपालिकांपासून बीएमसीपर्यंतच्या निवडणुकीत असते. त्यामुळे परदेशातून जी गुंतवणूक यायला पाहिजे, ती आम्हाला कधीच दिसली नाही. दावोसमध्ये बसून देखील ते महानगरपालिकेचेच राजकारण करणार आहेत. त्यापेक्षा इथे बसून दावोसमधील गुंतवणूक इकडे आणा, असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

हे ही वाचा…

आमदारांना पळवणारे आता नगरसेवकांसाठी का घाबरले?:शिंदेंना फडणवीसांच्या राजवटीचीही भीती वाटतेय, राऊतांचा बोचरा प्रहार

महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महापौर कोणाचा होणार? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले, त्यांना आज स्वतःच्या नगरसेवकांची भीती वाटतेय, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी ‘हास्यजत्रा’ आहे,” अशा शब्दांत राऊतांनी उपरोधिक टोला लगावला. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *