अमरावती विद्यापीठाचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर:प्राचार्य मांडवकर, गव्हाळे, धोटे, देशमुख यांच्यासह 12 जणांना सन्मान

0
1a45c318-35df-4e0f-9918-62372708c9fc_1777479432250.jpg




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे यावर्षीचे उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र दिन आणि विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त १ मे रोजी हे पुरस्कार वितरित केले जातील. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर दृकश्राव्य सभागृहात विशेष समारंभात हे वितरण होईल. या पुरस्कारांमध्ये इंदिरा महाविद्यालय, कळंबचे प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांचा समावेश आहे. त्यांच्यासह गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजार येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नंदकिशोर गव्हाळे, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथील प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयश्री धोटे आणि इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावती येथील अधीक्षक प्रशांत देशमुख यांनाही सन्मानित केले जाईल. याशिवाय, विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. संयोगिता देशमुख, परीक्षा विभागातील सहायक कुलसचिव मिलींद देशपांडे, महाविद्यालयीन विभागातील सहायक कुलसचिव डॉ. साक्षी ठाकूर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत. आस्थापना विभागातील अधीक्षक अमोल म्हैसाळकर, परीक्षा विभागातील अधीक्षक स्मिता म्हैसाळकर, वित्त विभागातील वरीष्ठ सहाय्यक संजय कोकाटे, ज्ञानरुाोत केंद्रातील ग्रंथालय सहाय्यक ज्योती गेडाम आणि सामान्य प्रशासन विभागातील चौकीदार मोरश्वर मुंजाळे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. याच समारंभात वार्षिकांक स्पर्धेतील विजेत्या महाविद्यालयांनाही कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते पारितोषिके दिली जातील. शहरी विभागातील बिगर व्यावसायिक गटातून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या ‘क्रिएशन’ला प्रथम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या ‘प्रज्ञासूर्य’ला द्वितीय, तर भारतीय महाविद्यालयाच्या ‘भारती’ला तृतीय पारितोषिक मिळाले आहे. ग्रामीण विभागात बिगर व्यावसायिक गटात इंदिरा महाविद्यालय, कळंबच्या ‘कदंबिनी’ आणि कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरबच्या ‘अंतरंग’ यांना संयुक्तपणे प्रथम पारितोषिक मिळाले आहे. गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चांदुरबाजारच्या ‘फुलोर’ला द्वितीय, तर आदर्श विज्ञान, जयरामदास भागचंद कला व बिर्ला महाविद्यालय, धामणगांव रेल्वेच्या ‘गुलमोहोर’ला तृतीय पारितोषिक घोषित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed