दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:तुळजापुरात वातानुकूलित 4 मजली दर्शन मंडप, 4 ऐवजी 2 तासांत दर्शन; अयोध्येच्या धर्तीवर दर्शनरांगेतच भाविकांना मिळणार नाष्टा, पाणी
![]()
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात अयोध्येच्या धर्तीवर २०२८पर्यंत विकासकामे करण्यात येणार आहेत. भाविकांसाठी ४ मजली दर्शन मंडप उभारण्यात येईल. तो पूर्णपणे वातानुकूलित असेल. योग्य व्यवस्थापनाने तुळजाभवानीमाते
.
अयोध्येच्या धर्तीवर दर्शनरांगेत अल्पोपाहार, थंड पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या १८६५ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील ५५५ कोटी ८० लाखांच्या प्रमुख चार कामांच्या निविदांना मान्यता देण्यात आली आहे.
मार्च २०२८पर्यंत विकासकामे पूर्ण होणार
विकासकामांचा दर १५ दिवसांनी आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. मार्च २०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दरवर्षी दसऱ्याला देवीच्या दर्शनासाठी सुमारे ५ लाख भाविक तुळजापुरात येत असतात. सुमारे ७ लाख भाविक शाकंभरी नवरात्रोत्सवासाठी येत असतात.
हडको सुविधा केंद्रात अत्याधुनिक सुविधा
भक्तांसाठी हडको सुविधा केंद्रात माहिती केंद्र, स्नानगृह व स्वच्छतागृह, बालसंगोपन केंद्र, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, प्रसाद काउंटर, वैद्यकीय सुविधा असेल. त्यामुळे देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांची सोय होणार आहे.
रामदरा तलाव परिसरात उद्यान, वॉटरफ्रंट विकास
रामदरा तलाव परिसरात भव्य उद्यान, साउंड अँड लाइट शो, वॉटरफ्रंट विकास, पायाभूत सुविधा आणि पर्यटनासाठी आवश्यक पायवाटा विकसित करण्यात येणार आहेत. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. विकासकामांना लवकरच प्रारंभ होईल.
१०८ फूट शिवभवानी शिल्प उभारले जाणार
तुळजापूर विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कुलस्वामिनी तुळजाभवानीदेवी आशीर्वाद देत असतानाचे १०८ फूट उंचीचे शिवभवानी शिल्प उभारले जाणार आहे. हे शिल्प भाविकांचे लक्ष वेधून घेईल असे असेल.
तीर्थक्षेत्र विकास : ५५५ कोटींतून पहिल्या टप्प्यात भाविक सुविधा केंद्र, वाहनतळ उभारणार
- तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ५५५ कोटी ८० लाख रुपयांच्या कामांना मान्यता मिळाल्याने विकासाला वेग आला आहे. घाटशीळ पार्किंग येथे भाविक सुविधा केंद्र आणि बहुउद्देशीय वाहनतळ उभारणीसाठी ७७.०२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- हडको पार्किंग परिसरात सुविधा केंद्र, व्यावसायिक संकुल, सभागृह आणि मोठ्या प्रमाणात वाहनतळासाठी ३७६.३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भाविकांना आपल्या वाहनांची पार्किंग करता येईल.
- आराधवाडी पार्किंग येथे सुविधा केंद्रासाठी ४५.४३ कोटी रुपये तर जुन्या बसस्थानक परिसरात भाविक सुविधा केंद्रासाठी ५७.२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांमुळे भाविकांना पार्किंग, निवास, विश्रांती, माहिती केंद्र आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मोबदल्यासाठी ३० टक्के निधीची केली तरतूद
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात भूसंपादन प्रक्रियेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनींचे संपादन करताना नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अंतिम आराखड्यात तब्बल ३० टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समाधानकारक आणि रास्त मावेजा मिळणार आहे.
-राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर
