![]()
दर्यापूर पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सांगवा बुद्रुक ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत अमरावती जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांनी भेट दिली. भेटीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत केलेल्या विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम, मकर संक्रांति निमित्त महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम, स्वयंरोजगारा बाबत महिलांचे विशेष प्रशिक्षण शिबीर, प्रधानमंत्री आवास अंतर्गत घरकुलाचे उद्घाटन, अनेक उपक्रमांस भेटी दिल्या व केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान गावकऱ्यांसोबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये लोकसहभाग वाढवणे लोकवर्गणी तसेच अभियानातील निकषांबाबत मार्गदर्शन केले. तसेच उमेद अंतर्गत ग्राम संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी दर्यापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सी.जे.ढवक, विस्तार अधिकारी पंचायत संदीप देशमुख,विस्तार अधिकारी राजकुमार चांदुरकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी अमोल मेरगळ, गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे, तसेच दर्यापूर पंचायत समीतीमधील विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सांगवा बुद्रुक सरपंच श्रीकृष्ण कराळे, उपसरपंच विजय सगणे, ग्रामपंचायत अधिकारी सुरज भोपसे गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनशी संवाद साधताना सीईओ संगिता महापात्रा व उपस्थित ग्रामस्थ व महिला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान:सीईओ संजीता महापात्रा यांची सांगवा बुद्रूक ग्रामपंचायतीला भेट
