![]()
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खैरेवाडी गावाकडे जाणारा चिंचलेखैरे – खैरेवाडी या तीन किमी रस्त्याच्या कामासाठी प्रस्थाव पाठवण्यात आला होता. त्यापैकी प्रशासनाकडून ८०० मीटर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली आहे. मात्र आठ महिने उलटूनही अद्याप रस्त्
.
गोरगरीब आदिवासी बांधवांकडे शासनाचे लक्ष नाही. खैरेवाडीकडे जंगलातून जावे लागते. जाताना ३ ओहळ लागतात. पावसाळ्यात तर फारच अडचण आहे. रस्त्याची समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. – पांडूरंग पारधी, अध्यक्ष, आदिवासी राया ठाकर संघटना.
चिंचलेखैरे ते खैरेवाडी हा ८०० मीटरचा रस्ता आदिवासी उपाययोजनेतून मंजूर करण्यात आला आहे. १ मार्च २५ ते १ मार्च २६ पर्यंत १ वर्ष कामाची मुदत आहे. वन विभागाच्या विविध परवानग्यांमुळे रस्त्याचे काम रखडले होते. अजून ४ महिने शिल्लक आहेत. मी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली आहे. साधारणत: १ महिन्यात काम करण्याचे उद्दिष्ट असून, संबंधित ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– अनिल बैसाने, उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
