ऐतिहासिक देखण्या पुरंदर किल्ल्याची लक्षवेधी प्रतिकृती:छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा लक्षवेधी देखावा




प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची ६ मार्च २०२६ रोजी (तिथीनुसार) जय बाभळेश्वर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यंदा शिवजयंतीचे ३२ वे वर्ष होते. हा जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.शिवजयंतीनिमित्त (तिथीनुसार) जुन्या शहरातील जय बाभळेश्वर मंदिराच्या प्रांगणात साकारण्यात आलेला पुरंदर किल्ला आणि आणि त्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची लक्षवेधी प्रतिकृतीचा देखावा साकारला होता. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता डाबकी रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारलेल्या महिला, युवती, चिमुकल्या मावळ्यांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीचा समारोप छत्रपती शिवाजी नगरस्थित भाजी बाजार येथील शिवरायांच्या प्रतिमेसमोर करण्यात आला. शनिवार ७ मार्च रोजी रात्री ८ वाजता शिवपूजनाने शिवजन्मोत्सव सोहळ्याचा समारोप हो णार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *