![]()
पुणे मेट्रोकडून महिला आणि जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ पासून जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोच्या सर्व मेट्रो ट्रेनमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा ठेवण्यात येणार आहेत. पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पुणे मेट्रोच्या ट्रेनमधील तीनही कोचेसमध्ये ही नवीन आसन व्यवस्था लागू करण्यात आली असून, यामुळे विशेषतः वृद्ध नागरिक आणि महिला प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. सध्या राखीव जागांचे नियोजन असे असेल : कोच (डबा) महिलांसाठी राखीव जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव जागा पहिला कोच (DMA Car) १४ ०२ मधला कोच (T-Car) १८ ०४ तिसरा कोच (DMB Car) १४ ०२ एकूण ४६ ०८ मेट्रोच्या प्रत्येक ट्रेन मध्ये महिला प्रवाश्यांसाठी ४६ जागा, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ (आठ) जागा राखीव असणार आहेत. या आसन व्यवस्थेचा सविस्तर आराखडा पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर आणि अधिकृत ॲपवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये दर्शवलेल्या चिन्हांनुसार राखीव जागा ओळखून त्यानुसारच बसण्याची विनंती प्रवाशांना करण्यात येत आहे. पुणे मेट्रो प्रवाशांना या राखीव जागांच्या नियमांचे पालन करण्याचे आणि सहप्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे मेट्रोमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव जागा:8 मार्चपासून प्रत्येक ट्रेनमध्ये 46 महिला, 8 ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा
