अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त


अवैध गुटखा-पानमसाला विक्रीवर वजिराबाद पोलिसांची कारवाई; ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वजिराबाद पोलिसांनी अवैध गुटखा, सुगंधीत तंबाखू व पानमसाला विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

मिळालेल्या गुप्त माहितीवरून वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक, सुनील बुलंगे, तसेच पोलीस कर्मचारी राठोड, पावडे, मठपती, मारोती मुसळे, हबीब चाऊस यांच्या पथकाने नांदेड येथील जेलरोडवरील TVS शोरूमसमोर छापा टाकला.

या छाप्यात आरोपी आकाश अनील शेटे (वय २४) आणि अविनाश (वय २२, दोघे रा. नांदेड) यांनी आपल्या ताब्यात शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुगंधीत तंबाखू, चुना, मिश्रीत खर्रा गुटखा व इतर मटेरिअल विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सुमारे ३१,२९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विजराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २७४, २७५ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी अवैध वाळू उत्खनन, वाहतूक, अवैध दारू, जुगार, गुटखा अशा प्रकारच्या गैरव्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, पोलीस निरीक्षक अजित कुंभार, तसेच पोलीस उपनिरीक्षक बुलंगे, पोलीस अंमलदार गुरदीपसिंघ कालरा, राठोड, पावडे,बावरी, मठपती, मारोती मुसळे, हबीब चाऊस यांचा सहभाग होता. पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहतील, असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *