अहमदाबादमध्ये कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थिनीला क्रेनने चिरडले:सुमारे 50 फूट फरफटत नेले, घटनास्थळीच मृत्यू; चालकाला अटक

[ads1]


गुजरातमधील अहमदाबाद येथे महाविद्यालयात जात असलेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला क्रेनने चिरडले आणि तिला सुमारे ५० फूट फरफटत नेले. या अपघातात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर फरार झालेल्या क्रेनचालकाला पोलिसांनी अटक केली. हा अपघात मंगळवारी झाला होता, त्याचा व्हिडिओ बुधवारी समोर आला. मृत विद्यार्थिनीचे नाव प्रेरणा नीनामा आहे. ती गोटा येथील सिल्व्हर ओक विद्यापीठात बीएससी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ती घरातून महाविद्यालयासाठी निघाली होती. ती महाविद्यालयापासून २०० मीटर दूर असताना मागून येणाऱ्या क्रेनने तिला धडक दिली आणि विद्यार्थिनीला फरफटत नेत तिच्यावरून क्रेन पुढे गेली. अपघाताची ३ छायाचित्रे… आरोपीची ओळख अरुण निषाद अशी झाली स्थानिक लोकांनी विद्यार्थिनीला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी स्वतः आरोपीचा शोध सुरू केला आणि त्याला जवळच्या सोला परिसरात शोधून काढले. आरोपीची ओळख अरुण निषाद अशी झाली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात सकाळी सुमारे 11:55 वाजता प्रेरणा रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी जाताना दिसत आहे. त्याच वेळी मागून आलेल्या क्रेनने तिला धडक दिली आणि तिच्यावरून पुढे गेली. त्यानंतर क्रेन काही अंतरावर जाऊन थांबली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यावर पदपथ नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरूनच चालावे लागते. अपघातानंतर लोकांनी नगरपालिकेच्या व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *