Eknath Shinde Faction Workers Assault Dahisar Campaign Violence FIR | प्रचाराला विरोध केल्याने घरात घुसून राडा: शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून दोघांना लाथा-बुक्क्यांसह झेंड्याने बेदम मारहाण, दहिसरमधील घटना – Mumbai News



मुंबईत महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दहिसर पश्चिम परिसरात सोमवारी सायंकाळी मोठा राडा झाला. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचार फेरीत सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून दोन व्यक्तींना लाथा-बुक्क्यांनी आणि चक्क पक्षाच्या झेंड्यांच

.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, दहिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा राम यादव यांच्या प्रचारासाठी रॅली काढण्यात आली होती. दहिसर विठ्ठलवाडी सोसायटीजवळ ही रॅली आली असता, काही कार्यकर्ते एका घरात प्रचार करण्यासाठी शिरले. मात्र, संबंधित घरातील व्यक्तींनी घरात येऊन प्रचार करण्यास विरोध केला. याच रागातून कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी घरातील दोन पुरुषांना बाहेर ओढत बेदम मारहाण सुरू केली.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ८ ते १० कार्यकर्ते दोन व्यक्तींना घेरून मारहाण करताना दिसत आहेत. मारहाण करण्यासाठी त्यांनी हातात असलेल्या पक्षाच्या झेंड्यांचाही वापर केल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. या मारहाणीमुळे दहिसर परिसरात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.

पोलिसांकडून धरपकड सुरू

घटनेची माहिती मिळताच पीडित व्यक्तींनी एम.एच.बी (M.H.B) पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत मारहाण करणाऱ्या ८ ते १० कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संताप

“अजून निवडणुका व्हायच्या आहेत आणि उमेदवार निवडूनही आलेले नाहीत, तरीही कार्यकर्त्यांची ही दादागिरी असेल, तर भविष्यात हे लोक काय करतील?” असा संतप्त सवाल दहिसरमधील स्थानिक नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाच्या प्रतिमेला तडा गेल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा…

‘समृद्धी’वर मेहकरजवळ धावत्या बसला आग:ट्रॅव्हल्सचा झाला कोळसा, 52 प्रवाशांचे प्राण वाचले; ‘त्या’ काळ्या दिवसाची आठवण

१ जुलै २०२३ चा तो दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही, जेव्हा समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज, ६ जानेवारी २०२६ च्या पहाटे तसाच काहीसा प्रसंग पुन्हा ओढवला. नागपूरवरून मुंबईकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हल्स अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ५२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *