Pune Municipal Election Aishwarya Pathare Ward 3 Manifesto | पुण्यात भाजपच्या ऐश्वर्या पठारे यांचा ‘कॉर्पोरेट’ स्टाईल जाहीरनामा: केवळ आश्वासने नव्हे, तर कामांचा कालमर्यादेसह स्पष्ट रोडमॅप – Pune News



पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वातावरण तापले असताना, विमाननगर–लोहगाव–वाघोली प्रभाग (वॉर्ड क्रमांक ३) चर्चेत आला आहे. या प्रभागातून भाजपच्या उमेदवार ऐश्वर्या पठारे यांनी ‘कॉर्पोरेट-शैलीतील’ जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामुळे मतदारांमध्ये उत

.

हा जाहीरनामा पारंपरिक निवडणूक जाहीरनाम्यांपेक्षा वेगळा असून, तो उद्दिष्टकेंद्रित आणि कालमर्यादांसह तयार करण्यात आला आहे. उच्चशिक्षित आणि व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या ऐश्वर्या पठारे यांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता, विकासकामांची अंमलबजावणी कशी केली जाईल याचा स्पष्ट आराखडा मांडला आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्ये आणि परिणामाभिमुख कार्यपद्धती यांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवी कार्यसंस्कृती आणण्याचा त्यांचा दावा आहे.

वॉर्ड क्रमांक ३ मधील लोहगाव, वाघोली आणि विमाननगर हे भाग वेगाने विकसित होत असले तरी, येथे पायाभूत सुविधांचा अभाव, वाहतूक कोंडी, अनधिकृत बांधकामे आणि नागरी सेवांवरील ताण हे गंभीर प्रश्न आहेत.

या पार्श्वभूमीवर, जाहीरनाम्यात रखडलेली कामे ठरावीक कालावधीत पूर्ण करणे, प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे आणि नियोजित नागरी विकासावर भर देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.

पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता आणि पारदर्शक कारभार या मुद्द्यांवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक विकासकामाचा प्रगती अहवाल सहा महिन्यांनी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

दरम्यान, विमाननगर परिसरातील आयटी व्यावसायिक, तरुण मतदार आणि सुशिक्षित नागरिकांकडून या ‘कॉर्पोरेट मॅनिफेस्टो’चे स्वागत होत आहे. सोशल मीडियावरही या जाहीरनाम्याची चर्चा वाढत असून, येत्या निवडणुकीत तो मतदारांच्या निर्णयावर किती प्रभाव टाकतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *