Sambhaji Brigade Protest Warning Vishwas Patil Clarification Apology Discussion Demand | ‘चूक झाली असल्यास नक्की सुधारेन’: संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर विश्वास पाटील यांची मवाळ भूमिका – Kolhapur News


संभाजी ब्रिगेडचे आंदोलनाचा इशारा देणारे कार्यकर्ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत. मी वीस वर्षांपूर्वी संभाजीराजांबद्दलची कादंबरी लिहिली आहे. त्यांच्या मागणी संदर्भात ते आणि मी एकत्र बसून चर्चा करणार आहोत. जर माझ्याकडून अनावधानाने संभाजीराजांबद्दल बदना

.

संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला ध्वजारोहण कार्यक्रम व विविध ठिकाणाहून आलेल्या ज्योतींचे स्वागत झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विश्वास पाटील यांना संभाजी ब्रिगेडने त्यांच्या संभाजी कादंबरीमध्ये संभाजी राजांच्या विषयी बदनामीकारक लिखाण केले आहे. त्याबद्दल माफी मागावी व त्या पुस्तकावर विक्रीसाठी बंदी घालावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने आज सातारा येथील पवई नाका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरात घोषणा देत आंदोलन केले आणि विश्वास पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात खुलासा करून माफी मागावी व दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली होती.

त्या संदर्भात प्रश्न विचारला असताना विश्वास पाटील यांनी माझ्या त्या कादंबरीच्या काही हजारात प्रति विकल्या गेलेल्या आहेत. अनेकांनी ही कादंबरी वाचली आहे. आंदोलनकर्ते व माझ्यामध्ये चर्चा झाली आहे आणि मी त्यांना असे सांगितले आहे की आपण दोघे एकत्रित चर्चा करू आणि जर अनावधानाने माझ्या हातून काही त्यात बदनामीकारक असे लिखाण झाले असेल तर मी नक्की सुधारणा करेन व माफी देखील मागेन.

दरम्यान अतिशय उत्साहात सातारकर व राज्याच्या बाहेरूनही अनेक साहित्यिक व साहित्यिक रसिक या संमेलनासाठी आलेले आहेत व त्यांचा उत्साह बघून पुढील चार दिवसात संमेलनाहून जाताना ते नक्कीच काहीतरी घेऊन जातील असा मला विश्वास आहे, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, साताऱ्याच्या राजवाडा परिसरातील गांधी मैदानापासून थोरले प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून 99 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या ग्रंथ दिंडीचे पालखी खांद्यावर घेताना स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, संमेलना अध्यक्ष विश्वास पाटील, मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *