मुदखेड (प्रतिनिधी)- शहरातील व्यंकटेशनगर परिसरात भरदिवसा घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १४ ऑगस्ट रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान व्यंकटेशनगर, ता. मुदखेड येथे फिर्यादी बाबुराव गोविंद गंगासागरे (वय ७० वर्षे) यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ५६,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सोनकांबळे करीत आहेत. भरदिवसा घरफोडी झाल्याने व्यंकटेशनगर परिसरात नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे
Post Views: 207

