“राज्यात सुरुवातीला माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली, त्यानंतर अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला आणि आता अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. या सर्व घटनांची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळी उघडपणे स्वीक
.
चंद्रपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, मुंबईतील वाढती टोळीयुद्धसदृश परिस्थिती आणि गृह विभागाच्या निष्क्रियतेवर अतिशय कठोर शब्दांत ताशेरे ओढले.
दाऊद इब्राहिमनंतर बिश्नोई टोळीचे साम्राज्य निर्माण करण्याचा घाट
मुंबईतील वाढत्या गुन्हेगारी घटनांवर चिंता व्यक्त करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, “एकेकाळी मुंबईत दाऊद इब्राहिमच्या टोळीने दहशत माजवली होती. त्यानंतरच्या काळात पोलिसांनी गुन्हेगारांचा बीमोड केला होता. मात्र, आता पुन्हा त्याच पद्धतीने बिश्नोई टोळीचे नेटवर्क महाराष्ट्रात सक्रिय झाले आहे. सलग 3 ते 4 मोठ्या घटनांमध्ये याच टोळीचा थेट सहभाग असल्याचे स्वतः आरोपी जाहीर करत आहेत. यावरून महाराष्ट्रात बिश्नोई गँगची समांतर राजवट स्थापन करण्याचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट दिसते.”
तुरुंगात बसून नेटवर्क कसे चालते?
“टोळीचा मुख्य म्होहरा लॉरेन्स बिश्नोई स्वतः तुरुंगात आहे; तरीही त्याची टोळी राजरोसपणे मुंबईत येऊन गोळीबार करते, हत्या घडवून आणते आणि पसार होते. गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा काडीमात्र धाक उरलेला नाही. गृहखाते इतके कमकुवत का झाले आहे? सरकार या गुन्हेगारांना आळा घालण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”

गृह खात्याचा कारभार सुरक्षेसाठी आहे की केवळ दाव्यांसाठी?
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर थेट हल्ला चढवत वडेट्टीवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टचा पुनरुच्चार केला. “मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अतिसंवेदनशील महानगरामध्ये जर सिनेअभिनेते, राजकीय नेते आणि नामांकित व्यक्ती सुरक्षित नसतील, तर गल्लीबोळात राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? वारंवार अशा घटना घडणे हे गृहखात्याचे आणि सरकारचे संपूर्ण अपयश आहे.”
केवळ खुलासे नकोत, ठोस कृती करा
“गुन्हेगारांना कायद्याचा वचक दाखवणे आणि जनतेला सुरक्षिततेची हमी देणे हे गृह विभागाचे प्राथमिक कर्तव्य आहे. टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणाची वरवरची चौकशी न करता मुळापर्यंत जाऊन मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. गृह खात्याचा कारभार फक्त टीव्हीवर येऊन खुलासे करण्यासाठी आणि मोठे दावे करण्यासाठी आहे की जनतेला संरक्षण देण्यासाठी, याचे थेट उत्तर गृहमंत्र्यांनी जनतेला दिले पाहिजे.”
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाने मुंबईत घबराट
जुहू येथे रविवारी रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. जुहू पोलीस ठाण्यापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्लेखोरांनी 7 ते 10 राऊंड गोळ्या झाडल्या. टायगर सुखरूप बचावला असला तरी त्याचा चालक फिरदोस आणि 1 चाहता गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा संशय
अमेरिकेतून अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचा दावा समोर आल्यानंतर, परदेशात बसलेले हस्तक महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला थेट आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले असून यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे.
————————————————————-
हेही वाचा…
आरोपींचे आका कुठेही लपलेले असोत, त्यांना शोधून काढू: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गँगस्टर्सना इशारा

जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची माहिती दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींची ओळख पटवली असून, हे भ्याड हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड (आका) जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले, तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad