‘We are afraid to even step out of our homes, Ward 25 is a haven for crime’, Sambhajinagarkar expresses his anguish | लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: ‘आम्हाला घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते, प्रभाग 25 गुन्हेगारीचा अड्डा’, संभाजीनगरकरांनी मांडली व्यथा – Chhatrapati Sambhajinagar News


छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गेलं असता नागरिकांनी समस्यांचा पाढाच वाचला. दिव्य मराठीने सुरु केलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शो ला संभाजीनगरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक प्रभागात अनेक समस्या आहेत. ज्यावर ना

.

शहरातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये गुन्हेगारी इतकी पराकोटीला गेली आहे की, नागरिकांनी समस्या सांगताना हात जोडून विनंती केली. प्रभागातील काही भाग हा गुन्हेगारीने व्यापला आहे. नशा करणारे तरुण, मारामारी, ड्रेनेज लाईन आणि पाणी यासारख्या मुद्द्यांना येथील नागरिकांनी हात घातला.

गुन्हेगारी ही मुख्य समस्या

प्रभागातील रहिवासी महेंद्र मगरे यांनी सांगितले की, ‘आमच्या प्रभागात सर्वात मोठी समस्या म्हणजे वाढती गुन्हेगारी आणि नशाखोरी आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून या भागात राहतो. इथे ड्रग्स आणि बटन गोळ्या सर्रासपणे विकल्या जातात. त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास जास्त होतो. आम्ही तक्रार केली तर त्यांच्याकडे राजकीय पाठिंबा असतो आणि ते लगेच बाहेर निघून येतात. त्यामुळे तक्रार करूनसुद्धा काही फायदा नाहीये. एवढंच नाही तर ही पोर पोलिसांना देखील पैसे देतात आणि निघून येतात. कोणी विरोधात बोललं तर गाड्या फोडणं आणि मारामारी करणं असे प्रकार घडतात. त्यामुळे संपूर्ण भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.’

प्रभाग २५ म्हणजे ड्रग्स स्मग्लरचा अड्डा…

प्रभागातील विठ्ठलनगर मधील नागरिकांशी संवाद साधला असता समजले की, घराच्या पाठीमागे असलेली मोकळी जागा ही ड्रग्स स्मग्लरचा अड्डा आहे. या भागात राहणाऱ्या महिला म्हणाल्या की, ‘आम्हाला आमच्याच घरातून बाहेर निघता येत नाही. घराच्या पाठीमागे खूप मोठी जागा आहे पण ती जागा काहीच कामाची नाहीये. एकतर ड्रेनेज लाईन फुटलेली आहे आणि दुसरीकडे नशा करणारे पोरं पोरी येतात. त्यांनी इथे त्यांचा अड्डाच तयार केला होता. आम्ही तक्रार केली तर आम्हाला म्हंटल जात होत की, तुम्हाला काय एकट्यालाच त्रास होतो का? म्हणजे आमच्या समस्येकडे कोणी बघायला सुद्धा तयार नाही. वारंवार तक्रार केल्यानंतर अतुल घडामोडे आले आणि त्यांनी जेसीपीने सगळी झाड तोडली. त्यानंतर फक्त ८ दिवस सगळं चांगल चाललं मात्र त्यानंतर पुन्हा ही पोर येऊन इथे बसायला लागली आहेत. आम्हाला इथे एक कंपाऊंड वॉल तयार करून द्यावी म्हणजे आम्ही आणि आमचे मुलं सुरक्षित राहू.’

महिलांनी पुढे सांगितले की आम्ही त्यांना अनेकदा हाकलण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांच्याकडे हत्यार असतात त्यामुळे भीती वाटते. एकतर नशा केलेली असते आणि त्यांना व्यवस्थित चालता देखील येत नाही. रात्री ३ -४ वाजेपर्यंत या सगळ्या गोष्टी चालू असतात. प्रभागातील वाढती गुन्हेगारी ही खूप गंभीर विषय बनत चालला आहे. त्यामुळे या समस्येला कुठेतरी आळा घालणे गरजेचे असल्याचं येथील स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

महिन्यातुन दोनदा पाणी पुरवठा होतो

प्रभागात राहणारे सुरेश जाधव म्हणतात की, ‘आमच्याकडे १५ दिवसातून एकदा पाणी येत म्हणजे महिन्यातून फक्त दोन वेळेस पाणी पुरवठा केला जातो. प्रत्येकाकडे पाण्याचा साठा असेलच असं नाही ना. कोणाकडे १००० आहे तर कोणाकडे ५०० लिटरची टाकी असते आणि आम्ही प्रत्येक दिवसाला टँकर बोलावू शकत नाही. म्हणजे आमचेच पैसे घेऊन आम्हालाच पाणी द्यायचं नाही हे चुकीचं आहे. अनेकदा तक्रार केली तर नुसतं कागद घेतात आणि लिहितात. पण अजूनही त्यावर काही कारवाई नाही. तीन दिवसाला पाणी देऊ अशी नुसती घोषणा केली होती. तीन दिवसाला नाही पण कमीत कमी ८ दिवसाला तरी पाणी द्या…’

अशी आहे प्रभागाची व्याप्ती

प्रभाग क्रमांक २५ मध्ये रामनगर भागशः, प्रकाश नगर, तानाजी नगर, संघर्ष नगर, श्रद्धा कॉलनी, म्हाडा कॉलनी, सदाशिव नगर, तोरणागड कॉलनी, शाहु नगर, कामगार कॉलनी, पुष्पक गार्डन, जय भारत कॉलनी, चिकलठाणा गाव, चिकलठाणा भागशः बौद्धवाडा, मोतिवाला नगर, हनुमान नगर चौक, पायलट बाबा नगरी यांचा समावेश आहे. या भागाची एकूण लोकसंख्या 39847 एवढी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *