![]()
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. जुन्नर-शिरूर सीमेवर असलेल्या पारगाव तर्फे आळे परिसरात आज पुन्हा एकदा बिबट्याने एका मुलाचा बळी घेतला. आई-वडील शेतात काम करत असताना बाजूला खेळणाऱ्या 8
.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहितचे कुटुंब शेतमजूर असून ते पारगाव शिवारातील एका शेतात कांदा लागवडीचे काम करत होते. आई-वडील कामात व्यस्त असताना रोहित शेताच्या बांधावर खेळत होता. त्याचवेळी शेजारील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधत अचानक रोहितवर झडप घातली. काही कळायच्या आतच बिबट्याने त्याला ऊसात फरफटत नेले. आरडाओरडा ऐकून आई-वडील आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या हल्ल्यात रोहितचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अजून किती बळी जाण्याची वाट पाहणार?
रोहितच्या मृत्यूने काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत या परिसरातील बिबट्याच्या हल्ल्यातील हा चौथा मृत्यू आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. “प्रशासन अजून किती निष्पाप जिवांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, ग्रामस्थांनी तात्काळ पिंजरे लावण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी लावून धरली आहे.
पुण्यातही बिबट्याच्या चर्चा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
एकीकडे ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले वाढले असताना, दुसरीकडे पुणे शहरातील खराडी भागातही बिबट्याच्या वावरच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही नागरिकांनी पोलिसांना फोन करून परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “अफवांवर विश्वास ठेवू नका, मात्र काही संशयास्पद हालचाल दिसल्यास किंवा बिबट्या दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा,” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जुन्नरमध्ये दीड महिन्यात 68 बिबटे जेरबंद
दरम्यान, जुन्नर वनविभागात बिबट्यांचा धुमाकूळ रोखण्यासाठी प्रशासनाने १३ कोटींचा निधी वापरून ४०० नवीन पिंजरे तैनात केले. या मोहिमेला मोठे यश आले असून, अवघ्या दीड महिन्यात तब्बल ६८ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. मात्र, आता माणिकडोह निवारा केंद्राची क्षमता संपल्याने या बिबट्यांना ठेवायचे कुठे, असा यक्षप्रश्न वनविभागासमोर उभा राहिला आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 बिबट्यांना जामनगर येथील वनतारा (गुजरात) येथे हलवण्यात आले असून, जिल्ह्यात 4 नवीन निवारा केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेसाठी सौर कुंपण, नेक गार्ड वाटप आणि बिबट नसबंदीसारख्या उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यात येत आहेत. वनविभागातील 233 अतिसंवेदनशील गावांना ‘संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे. शेतातील घरे आणि गोठ्यांकरिता 150 सौरऊर्जा कुंपण बसविण्यात आले असून, आणखी 550 घरांना देण्याचे नियोजन आहे.
