Entrepreneur Nitin Dalvi receives Gadge Baba Service Award | उद्योजक नितीन दळवी यांना गाडगेबाबा सेवा पुरस्कार: गाडगेबाबांच्या पुण्यतिथी महोत्सवात अमरावतीत सन्मान – Amravati News



मुंबईचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन दळवी यांना गाडगेबाबा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमरावती येथील गाडगेबाबांच्या समाधी मंदिरात आयोजित पुण्यतिथी महोत्सवादरम्यान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

.

संस्थेचे विश्वस्त आणि गाडगे महाराज मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्या हस्ते दळवी यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन गौरवण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. अरविंदराव देशमुख, ह.भ.प. संदीप गिरी महाराज, डॉ. राजकुमार लंगडे, ह.भ.प. भरत महाराज रेडे, संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश महात्मे, नागरवाडी येथील आश्रमाचे गजानन देशमुख, मेळघाटचे रमेश तोटे आणि सुधीर धोंगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नितीन दळवी यांनी गाडगेबाबांच्या सेवा संस्थानच्या विविध उपक्रमांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गाडगे महाराज मिशनद्वारे संचालित विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवले असून, गुणवंत विद्यार्थ्यांनाही पुरस्कृत केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *