आपल्या नजाकतदार लावणीने आणि कसदार अभिनयाने तब्बल चार दशके मराठी रसिकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 73वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी लोककला, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा एक सुवर्णकाळ संपल्याची भावना व्यक्त होत असून, अवघ्या सांस्कृतिक महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. लावणीला केवळ मनोरंजनाचे साधन न ठेवता तिला आदराचे आणि वैभवाचे स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या कलावंतांमध्ये मधू कांबीकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. लोकनाट्य, तमाशा, प्रायोगिक रंगभूमी ते रुपेरी पडदा असा बहुआयामी प्रवास करत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या अस्सल मातीतील कलेला घराघरांत पोहोचवले. बीडच्या माळेगाव खुर्द ते लालबागचे हनुमान थिएटर: संघर्षाची देदीप्यमान यशोगाथा मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द या छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच कलेची उपजत आवड असणाऱ्या मधूताईंनी अत्यंत प्रतिकूल आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी दोन हात करत कलाक्षेत्रात पाऊल ठेवले. लावणीला अभिजात नृत्याची जोड देण्यासाठी त्यांनी कथ्थक नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणात एक अनोखा तोरा, तोल आणि ठहराव पाहायला मिळायचा. हनुमान थिएटरमधून कारकिर्दीची मुहूर्तमेढ 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील ऐतिहासिक आणि लोककलेचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या ‘न्यू हनुमान थिएटर’मधून त्यांच्या व्यावसायिक कलाप्रवासाला सुरुवात झाली. त्यांच्या घुंगरांच्या बोलांनी आणि नृत्यातील अदाकारीने अवघ्या मुंबईकरांना भुरळ घातली. रुपपेरी पडदा गाजवला; आई आणि सासूच्या भूमिकांना दिले नवे परिमाण लावणीच्या मंचावरून सुरू झालेला हा प्रवास पुढे मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत दिमाखात बहरला. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘हेच माझं माहेर’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘रावसाहेब’, ‘डेबू’, ‘माझा छकुला’ आणि महेश कोठारे दिग्दर्शित सुपरहिट ‘झपाटलेला’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित आणि पु. ल. देशपांडे यांच्या पटकथेवर आधारित ‘एक होता विदूषक’ चित्रपटातील त्यांची लावणी आणि व्यक्तिरेखा आजही मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड मानली जाते. चित्रपटांमध्ये केवळ नृत्यांगना न राहता त्यांनी सोशिक आई, कणखर सासू अशा कौटुंबिक नात्यांमधील विविध रंग आपल्या नैसर्गिक आणि सहज अभिनयातून पडद्यावर जिवंत केले. 27 नोव्हेंबर 2016, तो अखेरचा रंगमंच आणि नियतीचा आघात मधू कांबीकर यांच्या आयुष्यात 27 नोव्हेंबर 2016 हा दिवस दुर्दैवी ठरला. मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात आयोजित ‘लावण्य संगीत’ या विशेष कार्यक्रमात त्या तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा मंचावर उतरल्या होत्या. नृत्याचे सादरीकरण सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. मात्र, “मंचावर गेलेला कलावंत अर्धवट माघार घेत नाही” या लोककलावंताच्या बाण्याने त्यांनी प्रचंड त्रास सहन करत जिद्दीने शेवटची ‘भैरवी’ सादर केली. पक्षाघाताचा झटका प्रेक्षकांची दाद घेऊन नेपथ्यात (मेकअप रूम) परतताच त्यांना पक्षाघाताचा तीव्र झटका आला. या झटक्याने त्यांचा उजवा हात बधिर झाला आणि प्रकृती गंभीर झाली. त्यानंतर त्या कधीही पूर्ववत मंचावर घुंगरू बांधून उभ्या राहू शकल्या नाहीत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आपल्या लाडक्या कलाक्षेत्रापासून आणि कॅमेऱ्यापासून कायमचे दूर राहावे लागले. जीवनगौरव पुरस्काराने सन्मान मराठी कलासंस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत 2018 मध्ये त्यांना मानाचा ‘झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या प्रत्यक्ष या सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नव्हत्या; त्यांच्या वतीने त्यांची सून शीतल जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. सांस्कृतिक महाराष्ट्राचा कंठ दाटला “ज्या घुंगरांच्या नादाने महाराष्ट्राला ताल दिला, त्या पायांतील घुंगरू आज कायमचे शांत झाले,” अशा शब्दांत नाट्य, चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, मराठी रसिकांच्या हृदयात मधू कांबीकर यांच्या अदाकारीची आणि लोककलेची सुवर्णपाने कायम तेवत राहतील. —————————————————————– हेही वाचा… ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक: आज राज्यभर स्वाक्षरी मोहीम, राज ठाकरे शिवाजी पार्कवर लावणार हजेरी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आता आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मनसेकडून आज राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येणार असून, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः या मोहिमेत सहभागी होणार आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
महाराष्ट्राच्या लोककलेचा नंदादीप मालवला:लावणी कलावंत ते कसदार अभिनेत्री, मधू कांबीकर यांचे निधन; वयाच्या 73व्या वर्षी पुण्यात घेतला अखेरचा श्वास!