Lost his life in a hurry to board the bus | बसमध्ये चढण्याची घाई जिवावर बेतली: चाकाखाली आल्याने प्रवाशाच्या जागीच मृत्यू, हिंगोली बसस्थानकावरील घटना – Hingoli News



हिंगोली बसस्थानकामध्ये बसमध्ये चढण्याच्या घाईमध्ये बसच्या समोरील चाकाखाली सापडून एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी ता. २८ रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असून चालकाला ताब्यात

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील राजेश अोमप्रकाश अग्रवाल (५०) हे हिंगोली शहरातील एका हॉटेलवर काम करतात. नेहमी प्रमाणे आज सकाळी ते हॉटेलवर कामासाठी आले होते. रात्रीच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी ते हिंगोलीच्या बसस्थानकावर आले होते.

दरम्यान,रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कंधारा आगाराची कंधार ते रिसोड बस हिंगोली स्थानकात आली होती. यावेळी बसमध्ये जागा पकडणे व बसण्याच्या घाईमध्ये राजेश धावत बससमोर आले. यावेळी बस थांबण्यापुर्वीच बसमध्ये चढण्याच्या घाईत ते बसच्या समोरील चाकाखाली सापडले. बसचे चालक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे, जमादार संजय मार्के, अशोक धामणे, शेख महम्मद, अझहर पठाण, रमेश कोरडे, शेख मुजीब यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर मयत राजेश यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे.

हिंगोली आगाराचे निंयत्रण एफ. एम. शेख यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. तर एसटी महामंडळाकडून मयत राजेश यांच्या कुटुंबियांना तातडीची १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे आगाराच्या सुत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *