Nagpur Municipal Engineer Tejas Nimdev Dies Accident PHOTOS VIDEOS | भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू: आठ महिन्यापुर्वीच नागपूर मनपाचा झाला होता रूजू, गाववर शोककळा – Hingoli News



हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील तरुण अभियंत्याचा नागपूर येथे अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी ता. २७ सकाळी मृतदेहावर नागपूर येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मयत अभियंता तेजस निमदेव (२५) हा आठ महिन्यापुर्वीच अभियंता नागपूर

.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील मुळचे भिंगी येथील रहिवासी असलेले शिक्षक बालासाहेब निमदेव कुटुंबिय मागील काही वर्षापासून हिंगोली येथील बळसोंड भागात राहतात. त्यांचा मुलगा तेजस निमदेव (२५) हा सुमारे आठ महिन्यापुर्वीच नागपूर महानगर पालिकेत अभियंता पदावर रुजु झाला होता.

दरम्यान, नागपूर येथे रूजू झाल्यानंतर तेजस याने व्यायामासाठी जीम लावली होती. नेहमी प्रमाणे सोमवारी ता. २२ पहाटे तो त्याच्या दुचाकी वाहनावर जीम कडे निघाला होता. यावेळी त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी वाहन एका खांबावर जाऊन आदळले. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यामध्ये अतिरक्तस्त्राव झाला. सदर अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या तेजस यास उपचारासाठी रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

नागपूर येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील झाली. मात्र मागील दोन दिवसांत त्याची प्रकृती आणखीनच खालावली अन शुक्रवारी ता. २६ त्याचा मृत्यू झाला. मृतदेहावर नागपूर येथे शनिवारी ता. २७ उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे निमदेव कुटूुंबियांसह भिंगी गावावर शोककळा पसरली आहे. मयत तेजस याच्या पश्‍चात आई, वडिल एक भाऊ असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *