![]()
दानापूर गुरुकृपा व परिसरातील सहा ते सात गावांच्या सहभागातून २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिनानिमित्त आर्ट ऑफ लिव्हिंग ग्रामोत्सव व मेडिटेशन कार्यक्रम दानापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम हनुमान प्रसाद प्रसादासह जनता विद्यालय, दानापूर य
.
कार्यक्रमात हॉलिबॉल, मुला-मुलींसाठी १०० मीटर धावणे, खो-खो, गोळाफेक, थालीफेक, पारंपरिक भजन स्पर्धा, गरबा डान्स, योगा डान्स, सोलो डान्स, कराओके गायन, समाजप्रबोधनपर नाटिका, महाकालेश्वर डमरू पथक दानापूर यांचे विशेष सादरीकरण झाले. या सर्व स्पर्धांचे परीक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जिल्हा महिला प्रचारक संगीता गावंडे यांनी केले.
लहानपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला. खेळ व सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून आरोग्य, खेळाडूवृत्ती, सामाजिक एकोपा तसेच सांघिक भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. श्री रविशंकर यांनी ध्यानाच्या माध्यमातून जगाला दिलेल्या आनंद, समाधान व आंतरिक शक्तीच्या अनुभूतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. कार्यक्रमांच्या सांगतेनंतर गुरुदेवांसोबत मेडिटेशन केले. स्पर्धेत सर्वांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागी गावांतील आर्ट ऑफ लिव्हिंग स्वयंसवेकांनी महिनाभर केलेल्या सेवेमुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
