'राष्ट्रवादी'चा सोहळा:नाशिकमध्ये अजित पवारांच्या NCP चा वर्धापन दिन साजरा; दादांच्या आठवणीने कार्यकर्ते भावुक

0
whatsapp-image-2026-06-10-at-31908-pm_1781087838.jpeg




नाशिकमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापनदिन राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा म्हाडा सभापती राज्यमंत्री रंजन ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन होता. त्यामुळे पक्षात भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाला प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांची विशेष उपस्थिती होती. अजितदादा नसले तरी त्यांची कार्य पद्धती व काम करण्याची जिद्द सर्वांच्या स्मरणात राहील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असे आवाहन प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे पुरोगामी विचार व स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे विकासाभिमुख उद्दिष्ट साधत वाटचाल करत आहे. दादांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर चालत प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही यावेळी महाले यांनी केले. कार्यक्रमाला अर्जुन टिळे, अशोक सावंत, नाशिक लोकसभा अध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, अंबादास खैरे, निवृत्ती अरिंगळे, गटनेत्या सीमा ठाकरे, संजय खैरनार, प्रमोद सोनवणे, मनिष रावळ, संतोष भागवत, धंनजय निकाळे, नगरसेविका हेमलता पाटील, सोमनाथ बोराडे, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी उपस्थित होते. वर्धापन दिनाला शंकर मोकळ, नदीम शेख, नझर शाह, पुष्पा राठोड, सुरेखा पठाडे, जाकीर शेख, बाळासाहेब म्हस्के, विजय पंडित, दत्ता काका पाटील, दादा कापडणीस, जय कोतवाल, योगेश दिवे, संतोष भुजबळ, कुलदीप जेजुरकर, बाळू गांगुर्डे, शरद भास्कर, सय्यद अन्सारी कासिम, किरण पानकर, नाना साबळे, विकास सोनवणे, रवींद्र शिंदे, किरण जगझप, शरद पगार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम दिल्लीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाची सुनेत्रा पवार यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, ‘आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात.’ सुनेत्रा पवार आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, ‘आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार, त्यांचा मार्ग आणि त्यांचे कार्य पुढे नेण्याचा आम्हा सर्वांचा ठाम संकल्प आहे. आजपर्यंत साथ दिलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानते.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed