नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी मार्गे लातूर-पुणे विशेष गाडी
नांदेड-दिवाळी आणि छट निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी लातूर-पुणे मार्गे चालविण्याचे ठरविले आहे.
पुढील प्रमाणे –
नांदेड–पनवेलविशेष गाडीची एक फेरी :गाडी क्रमांक 07635 हुजूर साहिब नांदेड ते पनवेल विशेष गाडी दिनांक 06 नोवेंबर, 2024 बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 21.00 वाजता सुटेल आणि पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत मार्गे पनवेल येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 14.00 वाजता पोहोचेल.
पनवेल– नांदेड विशेष गाडी ची एक फेरी :गाडी क्रमांक 07636 पनवेल ते हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी दिनांक 07 नोवेंबर, 2024 गुरुवारी पनवेल रेल्वे स्थानकावरून दुपारी 15.15 वाजता सुटेल आणि पुणे, दौंड, लातूर, परळी, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 12:00 वाजता पोहोचेल.या गाडीत 24 डब्बे असतील.