![]()
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य दोषी आणि माजी भाजप आमदार कुलदीपसिंह सेगर याला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सत्र न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा स्थगित करताना सेगरने
.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की, उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी, भाजपचे माजी आमदार कुलदीप यांची शिक्षा स्थगित केल्याने जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याशिवाय, बलात्कारी व्यक्तीविरुद्ध निषेध करणाऱ्या पीडितेला आणि तिच्या आईला पोलिसांनी केलेली मारहाण धक्कादायक आहे. निवडणुकीच्या काळात भाजपने लाडकी बहीणसारख्या घोषणा दिल्या आणि योजना आखल्या. मात्र, आज पीडितेसोबत आणि आंदोलन करणाऱ्या तिच्या कुटुंबीयांसोबत काय घडत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले, जगभरातील देश आणि लोक हे पाहतील, यावर बोलतील. परंतु भारतात आंदोलनकर्त्यांवरच हुकूमशाही पद्धतीने टीका होत असून मंत्री देखील या पीडितांच्या आंदोलनाची टिंगल करतात. आपण हेच करायला आलो आहोत का? बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या माणसाला सर्वात कठोर शिक्षा मिळायला हवी होती, पण त्याला जामीन का मिळाला? हा न्याय आहे का? हे मानवीय आहे का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच, जोपर्यंत दोषींना न्याय मिळत नाही, तोपर्यंत सर्वांनी याबद्दल बोलणे पाहिजे, तसेच या घटनेचा निषेध करणे थांबवूच नये, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
सीबीआयचा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय
दरम्यान, उन्नाव बलात्कार पीडित प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्या जामीनाला हरकत घेत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सीबीआयने स्पष्ट केलं आहे.
