Chhatrapati Sambhajinagar Civic Polls: Water Crisis, Crime and Roads Dominate Ward 22 Talk Show | लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा: पाणी, गुंठेवारी, गुन्हेगारी, खोदलेले रस्ते गाजले; सत्ताधारी राहिलेल्या ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने! – Chhatrapati Sambhajinagar News


छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच अनुषंगाने दिव्य मराठी ॲपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा’ या टॉक शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क

.

ठाकरे गटाचे पदाधिकारी पुरुषोत्तम पानपट यांनी प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर असल्याचे सांगत, कोणतेही सरकार असले तरी हा प्रश्न तातडीने सोडवला पाहिजे, अशी भूमिका मांडली. दरम्यान, या मुद्द्यावरून शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली. शहराला पाणी कुणामुळे मिळाले नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे बोट दाखवत ठाकरे गटावर टीका केली.

या आहेत प्रमुख समस्या…

दिव्य मराठी ॲपचा टॉक शो आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये झाला. विद्यानगर, पुंडलिकनगर या भागातील इच्छुक उमेदवार आणि नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागामध्ये उच्चूभ्रू परिसरासर सर्वसामान्य लोकवस्ती असेलला परिसर सुद्धा आहे. या परिसरात रस्ते, ड्रेनेज, पाणी, गुंठेवारी, बॉन्डवरील घरे, वाढती गुन्हेगारी यासह अरुंद गल्ल्या या सारख्या समस्यांचा मोठा डोंगर असल्याचे दिसून आले आहे.

सात दिवसांनी पाणी येते…

तरुणांमधील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी प्रत्येक प्रभागात पोलिस चौकी असणे गरजेचे असल्याचा मुद्दाही नागरिकांनी मांडला. चुकीच्या मार्गावर जाणाऱ्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली. शिवसेनेच्या माजी नगरसेविका मीना गायके म्हणाल्या की, ‘आमच्या प्रभागात पाण्याची समस्या सर्वात मोठी आहे. पाणी हे 6-7 दिवसांनी येते ते किमान दोन-3 दिवसांनी यायला हवे. बाकी काहीच समस्या आमच्या प्रभागात नाही.’

उघड्या गटारीची समस्या…

ठाकरे गटाच्या पदाधिकारी विजयमाला शेरखाने म्हणाल्या की, ‘आमच्या समस्या 1990 पासून आहेत. त्या अजूनही जशाच्या तशा आहेत. आमच्या प्रभागात कधी 6 तर कधी 7 दिवसानंतर पाणी येते. आमच्याकडून टॅक्स घेऊन सुद्धा आम्हाला सुविधा दिल्या जात नाहीत. आमच्याकडे उघड्या गटारींचा सर्वांत मोठी समस्या आहे जी अजूनही सोडवली गेली नाही.’

कार्यकर्ते घाण करत आहेत…

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रेखा फलके म्हणाल्या की, ‘आमच्या प्रभागातील सर्वात मोठी समस्या ही पाण्याची आहे. पाणी येण्याचा काही ठराविक वेळ नाही. यामुळे महिला मोठ्या त्रस्त आहेत. गटारीच्या कामासाठी आमच्या परिसरातील सर्व रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. यामुळे जनता त्रस्त आहे. आमच्या परिसरात गटारीच्या खोदलेल्या खड्यामध्ये एका जणांचा जीव जावू शकत होता, पण आम्ही त्याला ओढून बाहेर काढले. याकडे अतुल सावे यांनी लक्ष दिले पाहिजे त्यांचे कार्यकर्ते तिथे येऊन घाण करत आहेत.’

स्वखर्चाने ड्रेनेज केले…

ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता मठपती म्हणाल्या की, ‘रस्त्यावर केलेल्या खोदकामांचा नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रोडच चांगले नसतील तर लोक चालणार कसे. गुरूदत्त नगरमध्ये तर आम्ही स्वखर्चाने ड्रेनेज केले आहे. सरकारला आमच्याकडे बघायला वेळ नाही गेली 25 वर्षे आमची हीच समस्या आहे. आमचा परिसर अनाथ असल्यासारखा आहे. आमच्या परिसराकडे कोणत्याही पक्षाचे लक्ष नाही. तिथे पाण्याची लाइनसुद्धा अजून आलेली नाही.’

प्रभागात आरोग्य केंद्र नाही…

ठाकरे गटाचे पदाधिकारी राज नीळ म्हणाले की, ‘आमच्या प्रभागात एकही आरोग्य केंद्र नाही. या प्रभागात 80 टक्के लेाक हे मध्यमवर्गीय आहेत. आरोग्य केंद्र हे प्रभागाच्या बाहेर आहे. हे काम काही आमदार खासदारांचे काम नाही. आमच्याकडे गुंठेवारीचा रेट जो आहे तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही. आमच्या ज्या मालमत्ता आहेत त्या लिगल झाल्या पाहिजे.’

गुंडामुळे घरातून निघणे अवघड…

रामश्वर मानकापे म्हणाले की, ‘आमच्या प्रभागात गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यामुळे जनतेला घरातून बाहेर निघणे अवघड झाले आहे. सर्व नागरिकांची मागणी आहे की या परिसरात एक पोलिस चौकी झाली पाहिजे. तरच इथली गुंडगिरी थांबेल आणि लोकांना सुद्धा दिलासा मिळेल. याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.’

तरुणांमध्ये नशेखोरी वाढली…

ज्योतीराम धोगंडे पाटील म्हणाले की, ‘आमच्या प्रभागातील काही तरुण हे नशेखोरीच्या आहारी गेले आहेत. आमच्या प्रभागातील युवकांना रोजगार मिळाला तर हे सर्व बंद होऊ शकेल त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जनतेच्या माध्यमातून आम्ही सर्व जण हे काम करणार आहोत. संदीपान भुमरे पालकमंत्री असताना आम्ही परिसरात अनेक कामे केली आहेत.’

प्रभागाची अशी आहे व्याप्ती…

प्रभाग क्रमांक 22 मध्ये विद्यानगर गिरीजा देवी कॉलनी, परिमल हाउसिंग सोसायटी, अलंकार कॉलनी, नंदिग्राम कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, भूषणनगर, न्याय नगर भागशः, हुसेन कॉलनी, दुर्गामाता कॉलनी, पुंडलिक नगर, मातोश्री नगर, गजानन नगर, हनुमान नगर भागश, न्यू हनुमान नगर, गणेश नगर, गुरुदत्त नगर, छत्रपती नगर, मानक नगर, विशाल नगर, बाळकृष्ण नगर, मोरेश्वर सोसायटी भागशः, शिवनेरी कॉलनी, न्यायमूर्ती नगर, इसाक नगर (आदर्श नगर), कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, जयदुर्ग हाऊसिंग सोसायटी, विजयनगर भागश:, मेमन कॉलनी हा भाग येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *