![]()
चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरजगाव कोरडे गावात उपसरपंचासह २५ ते ३० महिलांनी अवैध देशी दारू विक्रीला पायबंद घातला. सोमवारी सायंकाळी अंदाजे ७.३० वाजता महिलांनी घरातून दारू विकणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेची माहिती दारूबंदी विभाग
.
या कारवाईनंतर महिला रात्री दहा वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात थांबून होत्या. यावेळी अवैध दारू विकणाऱ्या व्यक्तीच्या घरातून सुमारे ११ हजार १०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. यापूर्वीही गावातील महिलांनी याच व्यक्तीला अवैध दारू विक्रीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात दिले होते, मात्र तरीही त्याचा व्यवसाय सुरूच होता.
यामुळे संतप्त झालेल्या उपसरपंच संगीता बद्रे, ताराबाई सोनसागडे, रेश्मा भंडारी, प्रतिभा चाचने, ऐश्वर्या चाचने यांच्यासह २५ ते ३० महिलांनी संबंधित व्यक्तीच्या घरावर धडक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन आपला निषेध नोंदवला.
शहर आणि तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीचे प्रमाण वाढले असून, यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला त्रस्त झाल्या आहेत. काही नागरिकांच्या मते, शहराच्या अनेक भागांत देशी दारूच्या नावाखाली रसायनयुक्त बनावट दारू तयार केली जात आहे. या बनावट दारूमुळे काही तरुणांचा बळीही गेल्याचा आरोप आहे. असे असतानाही, दारूबंदी विभाग आणि पोलिस याकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
