Former students of Yashwantrao Chavan High School met after 23 years, rekindled old memories, teachers were present | यशवंतराव चव्हाण हायस्कूलचे माजी विद्यार्थी 23 वर्षांनंतर भेटले: जुन्या आठवणींना दिला उजाळा, शिक्षकांची उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News
![]()
यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या २००२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा २३ वर्षांनंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला. कार्यक्रम सॉल्ट रेस्टॉरंट, एमजीएम कॅम्पस येथे झाला. सुमारे ७५ माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
शालेय आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मैत्रीच्या गप्पांनी वातावरण भावनिक झाले. महेंद्र ढाके, दिलीप खंडेराय, तांबोळी, पठाण, दराडे यांच्यासह इतर शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी भविष्यातही असे स्नेहमेळावे घेण्याचा संकल्प करण्यात आला. आयोजनासाठी परवीन शेख, सुकेशनी बन्सोडे, रामेश्वर क्षीरसागर, कल्याण करडे, मोईन खान, धनंजय मिटकरी, सचिन वाडेकर, गणेश शिकारे, कलीम शेख, गजानन सोनवणे, अमर लाहोत आणि इतर माजी विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. हा स्नेहमेळावा मैत्री, ऋणानुबंध आणि आठवणी अधिक घट्ट करणारा ठरला.
