बीडमध्ये पोलिसांचा मोठा दणका:विनापरवाना कलाकेंद्रावर छापा, 8 महिलांसह 10 जण ताब्यात; एक फरार




बीड जिल्ह्यात बेकायदेशीर आणि छुप्या पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या व्यवसायांवर प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. बीड जवळील उदंड वडगाव येथील एका विनापरवाना कलाकेंद्रावर पोलिसांनी मध्यरात्री धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ८ महिला आणि २ पुरुषांना ताब्यात घेतले असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीवरून पोलिसांची ‘रेड’
उदंड वडगाव येथील ‘जगदंबा कलाकेंद्र’ कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय किंवा प्रशासकीय परवानगीशिवाय चालवले जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नेकनूर पोलिस आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या संयुक्त पथकाने या केंद्रावर अचानक छापा टाकला. दोन चालक निष्पन्न, एक जण फरार पोलिस चौकशीत हे कलाकेंद्र पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले असून, आरिफ आसिफ शेख आणि शफिक अली मोमीन नावाचे दोन इसम हे केंद्र चालवत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून १० जणांना ताब्यात घेतले असले, तरी या प्रकरणातील एक मुख्य आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला. नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल; तपास सुरू या धडक कारवाईनंतर फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच आरिफ शेख, शफिक मोमीन आणि संबंधितांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलाकेंद्राच्या आडून इतर काही बेकायदेशीर किंवा अनैतिक प्रकार सुरू होते का, या दृष्टीने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि नेकनूर पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत. हे ही वाचा.. केतनला ढकलण्यापूर्वीच फोन सियाच्या हातात कसा?:डेटा डिलीट केल्याचा आणि हत्येच्या कटात तिसऱ्या व्यक्तीचाही सहभाग असल्याचा संशय व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, ते 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. आता या प्रकरणात डिजिटल पुराव्यांच्या अनुषंगाने आणि तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाच्या शक्यतेने तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलिस तपासात आणि न्यायालयात मांडलेल्या घटनाक्रमातून आणखी काही मुद्दे समोर आले आहेत. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *