90 km cycle from Satana to Nastanpur | सटाणा ते नस्तनपूर ९० किमी सायकल वारी: बागलाण सायकल फाउंडेशन‎चा संदेश‎ – Nashik News



.

बागलाण सायकल फाऊंडेशनच्या वतीने सटाणा ते नस्तनपूर सायकल वारीद्वारे साडेसहा तासात ९० किलोमीटर अंतर पार करीत सायकल चालवा पर्यावरण वाचवाचा संदेश दिला. या सायकलवारीत ७० सदस्यांनी सहभाग घेतला होता.

दि. ७ डिसेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजता येथील शिवतिर्थापासून सायकल राईडचा शुभारंभ करण्यात आला. कडाक्याच्या थंडीतही राईडमध्ये मोठ्या संख्येने सदस्यांनी सहभाग नोंदवला. संकष्टी चतुर्थी निमित्ताने दाभाडी येथे चिंतामणी गणपतीचे दर्शन घेत पहीला थांबा घेतला. तर दुसरा थांबा मालेगाव येथे मनमाडरोडवर घेत चहा, नाष्टा घेऊन थेट नांदगाव चौफुली गाठत. दुपारी १२:१५ वाजता नस्तनपूर गाठत श्री शनि महाराजांचे दर्शन घेतले. हास्यविनोद व पर्यावरणाचा संदेश देत सायकल राईडचा आंनद घेतला. यावेळी शनिमंदिर ट्रस्टचे विश्वस्त माजी आमदार अनिल आहेर यांनी सायकल फाउंडेशनच्या उपक्रमाबाबत कौतुक केले. यावेळीरायडर्सना फिट इंडिया मुंबई यांचे तर्फे टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. नस्तनपूर सायकल वारीत दीपक सोनवणे, मोहन सूर्यवंशी, रवींद्र भदाणे, योगेश सोनवणे, मोहन सोनवणे, प्रभाकर सोनवणे, आदींसह सर्व सदस्य सहभागी झाले होते. सायकल राईड सहकुटुंब असल्याने कुटुंबातील महीलांनीही सहभाग नोंदविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *