![]()
मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफला लक्ष्य करून गोळीबाराची घटना घडली. जुहू परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या काही व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या, ज्यामध्ये त्याचा चालक जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ जुहू येथील ‘पुष्पा पार्क’ परिसरात असताना मोटारसायकलवरून तीन व्यक्ती तिथे आल्या. कोणताही वाद नसताना, हल्लेखोरांनी अचानक टायगरच्या गाडीवर गोळीबार सुरू केला. या अचानक झालेल्या हल्ल्यात टायगरचा चालक आणि जवळच असलेला एक रिक्षाचालक गोळ्या लागल्यामुळे जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… गोळीबाराचे कारण अस्पष्ट; पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी संबंधित परिसर सील केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या मोटारसायकलचा नोंदणी क्रमांक मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले जात आहे. तसेच, पोलीस प्रत्यक्षदर्शींचे जबाबही नोंदवत आहेत. हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स टोळीने स्वीकारली मिळालेल्या माहितीनुसार, लॉरेन्स टोळीतील अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. अनिल पंडितने सोशल मीडियावर एक निवेदन पोस्ट केले आहे, ज्यात म्हटले आहे: “आम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याला समजले नाही. आज आम्ही त्याला अगदी स्पष्टपणे समजावून सांगितले आहे. मुंबई चित्रपटसृष्टीतील जो कोणी आमचे ऐकणार नाही—किंवा सलमानसोबत काम करण्याचा निर्णय घेईल—तो आमचे पुढचे लक्ष्य असेल.” आम्ही सातत्याने ही बातमी अपडेट करत आहोत….
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad