अवयवदानाचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी ‘दाते अमर राहती’ उपक्रम

Nanded

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत नांदेडमध्ये आयोजन; माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीतील जनसेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी नांदेड येथे ‘दाते अमर राहती’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हॉटेल स्कायलाइट लॉन्स, स्टेडियमसमोर येथे आयोजित या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार श्रीजयाताई चव्हाण, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, महापौर सौ. कविता संतोष मुळे, उपमहापौर दीपकसिंह रावत, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय कदम, नगरसेविका तथा भाजपा युवती आघाडीच्या प्रमुख शांभवी प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचे आयोजन नगरसेवक डॉ. अंकुश देवसरकर आणि डॉ. शुभांगी अंकुश देवसरकर यांनी केले. अवयवदानाबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे, अवयवदानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि अवयवदानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते, हा संदेश समाजात रुजविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाला भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अवयवदानाबाबत जागरूक असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry