Pune Liquor poisoning Case | पुणे-पिंपरी चिंचवड विषारी दारूकांड; तपासात नवीन धक्कादायक खुलासे, बाप-लेकाला अटक
Pune Liquor poisoning Case | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या भीषण विषारी दारूकांड प्रकरणात तपासाला मोठे वळण मिळाले आहे. विषारी दारूकांडात मिथेनॉल पुरवठा करणाऱ्या ठाण्यातील बाप-लेकाला सीआयडीने अटक केली आहे. Arun Jagdish Chaube आणि Abhishek Arun Chaube अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाण्यातील ‘रेक्स इंटरनॅशनल’ कंपनी त्यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आली आहे.
सीआयडीच्या तपासात या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे Yogesh Wankhede याला मिथेनॉल पुरवल्याचे उघड झाले. याच मिथेनॉलचा वापर करून तयार करण्यात आलेल्या विषारी दारूमुळे २५ जणांचा मृत्यू झाला.
बनावट आधार कार्ड आणि जीएसटी नंबरचा वापर
दापोडी आणि हिंजवडी परिसरातील विषारी दारूकांडाचा तपास करताना सीआयडी मिथेनॉल पुरवणाऱ्या कंपनीपर्यंत पोहोचली. तपासादरम्यान बनावट जीएसटी क्रमांक आणि प्रदीप शर्मा यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड वापरून २१० लिटर मिथेनॉलची विक्री करण्यात आल्याचे समोर आले. ही खरेदी केवळ १७ हजार ५०० रुपयांत करण्यात आली होती.
यानंतर सीआयडीने ठाण्यातील नारपोली परिसरातून चौबे बाप-लेकाला अटक केली. पिंपरी न्यायालयाने दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. या तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फक्त ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २५ जणांचा बळी
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, Yogesh Wankhede याने अल्प नफ्यासाठी विषारी दारूची विक्री केल्याचे उघड झाले आहे.
९ मे रोजी २१० लिटर मिथेनॉल खरेदी — खर्च ₹१७,५००
त्यानंतर ३५ लिटरचे ५ ड्रम दारू खरेदी — खर्च ₹९,५००
दारूमध्ये पाणी आणि मोठ्या प्रमाणात मिथेनॉल मिसळून १२ ड्रम तयार
१२ ड्रमची विक्री ₹२,८०० प्रमाणे — एकूण उत्पन्न ₹३३,६००
एकूण खर्च वजा केल्यानंतर नफा — फक्त ₹६,६००
या धक्कादायक प्रकारावर विधानसभेचे उपाध्यक्ष Anna Bansode यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी अवैध दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
News Title: Pune Liquor poisoning Case CID Arrest Arun Choubey Abhishek Choubey
