विसापूर वनपरिक्षेत्रात पाणवठे कोरडे; वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे मोर्चा:42 अंशांवरील तापमानामुळे पाण्याची तीव्र टंचाई; वन विभागाविरोधात संताप
![]()
तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव पंगू, समिट, तळेगावरोही तसेच येवला तालुक्यातील कातरणी, विसापूर वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे पूर्णपणे कोरडे पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या परिसरातील तापमा
.
शासनाकडून वन्यजीव संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना अनेक पाणवठ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जंगलातील पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने मोर, हरिण, ससे, कोल्हे, तरस, खोकड, लांडगे, रानडुक्कर तसेच बिबट्यासारखे वन्यजीव पाण्याच्या शोधात थेट शेतवस्त्या आणि मानवी वस्तीकडे वळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव शेतांमध्ये घुसून टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, वांगी, पालेभाज्या व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर हे नवीन संकट उभे ठाकले आहे. तसेच बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाण्याच्या शोधात बिबट्यासारखे हिंस्र वन्यप्राणी मानवी वस्तीजवळ येऊ लागल्याने नागरिक, लहान मुले आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वन्य पशु-प्राणीमित्र व समाजसेवक भागवत झाल्टे यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी शासन मोठा निधी देते, मग जंगलातील पाणवठे कोरडे कसे, असा सवाल उपस्थित करत मुक्या प्राण्यांना पाण्यासाठी तडफडत ठेवणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वन विभागाने तातडीने टँकरद्वारे कोरड्या पाणवठ्यांमध्ये पाणी भरण्याची व्यवस्था न केल्यास वन्य पशु-प्राणी मित्रांच्या मदतीने स्वतःतर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, असा इशाराही भागवत झाल्टे यांनी दिला आहे. दरम्यान, परिसरातील वनमजुरांचे गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची बाबही समोर आली आहे.
एका वर्षात अनेक वन्यजीवांचा मृत्यू विसापूर बिट वनपरिक्षेत्रातील विविध भागांमध्ये गेल्या वर्षभरात मोर, हरिण आणि इतर वन्यजीवांचे विहिरीत पडून तसेच रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वनरक्षक व वनपाल घटनास्थळी वेळेवर पोहोचत नसल्याने वन्यजीव संरक्षणाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री छगन भुजबळ, आमदार सुहास कांदे, आमदार नरेंद्र दराडे, शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार राहुल आहेर यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भागवत झाल्टे यांनी केली आहे.
