Today Gold Rate | सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे ताजे दर
Today Gold Rate | सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 4 जून रोजी मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये लक्षणीय घट नोंदवण्यात आली. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंचे दर कमी झाल्याने ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष सराफा बाजाराकडे लागले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर काय आहेत, याची माहिती जाणून घेऊया.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली. सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम तब्बल 1,258 रुपयांची घट झाली असून चांदीच्या दरात प्रति किलो 3,725 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या किमतींना काहीसा ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, गुरुवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 36 रुपयांवर पोहोचला. याआधी हा दर 1 लाख 56 हजार 294 रुपये होता. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 54 हजार 415 रुपये, 20 कॅरेट सोन्याचा दर 1 लाख 42 हजार 13 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 16 हजार 277 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 90 हजार 696 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका नोंदवला गेला.
Today Gold Rate | प्रमुख शहरांतील भाव आणि तज्ज्ञांचे विश्लेषण :
मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, जळगाव, सांगली आणि बारामती या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1 लाख 55 हजार 36 रुपये इतकाच राहिला आहे.
दरम्यान, IBJA नुसार चांदीचा भाव आज सकाळी प्रति किलो 2 लाख 61 हजार 575 रुपये नोंदवण्यात आला. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीतही लक्षणीय स्वस्ताई पाहायला मिळत आहे.
