The expected monsoon arrives; It will arrive in Konkan in 3 days, the monsoon will hit Kerala three days late
- Marathi News
- National
- The Expected Monsoon Arrives; It Will Arrive In Konkan In 3 Days, The Monsoon Will Hit Kerala Three Days Late
नवी दिल्ली2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

मान्सून केरळममध्ये दाखल झाला. हवामान विभागाने गुरुवारी नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा केली. यासोबतच जून ते सप्टेंबर या पावसाळी हंगालाला सुरुवात झाली. गुरुवारी मान्सून केरळमसोबतच तामिळनाडू व कर्नाटकच्या काही भागांतही पोहोचला. ३-४ दिवसांत तो गोवा व्यापून महाराष्ट्राच्या सीमेवर, म्हणजेच वेंगुर्लेपर्यंत पोहोचेल, असा अंदाज निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला. ८ जूनपर्यंत महाराष्ट्रात वारा, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून पोहोचला नाही, तिथेही पाऊस
गुरुवारी दुपारी नवीन पश्चिमी विक्षोभ आल्याने देशात अनेक भागांत वादळासह पाऊस झाला. उत्तरेकडील ४-५ राज्यांवर अनेक वादळेही सक्रिय होती. यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत पाऊस झाला. शुक्रवार-शनिवारही पाऊस पडेल.
छत्रपती संभाजीनगरमध्ये २ दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची चिन्हे
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून, येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवास महाराष्ट्रात सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार शहरात शुक्रवारी आणि शनिवारी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून, हलक्या ते मध्यम पावसाचीही शक्यता आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली असली तरी हवामान विभागाच्या इशाऱ्यांनाही पावसाने हुलकावणी दिली आहे. जून महिन्याच्या प्रारंभीच एक दिवस पूर्वमोसमी पाऊस झाल्यानंतर आता हवामान विभागाने पुन्हा एकदा शुक्रवार आणि शनिवारी शहरात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. या कालावधीत शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दरम्यान, किमान आणि कमाल तापमानातही घट झाली आहे, गुरुवारी शहराचे किमान तापमान ३९.८ अंश सेल्सियस तर किमान तापमान २५.४ अंश सेल्सियस होते. पुढील आठवड्यात कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.
ढगनिर्मितीअभावी पाऊस नाही
केरळममध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी मान्सूनचा पुढील प्रवास हा कमकुवत राहणार आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणामुळे तसेच एल निनोच्या प्रभावामुळे हवी तशी ढगांची निर्मिती होत नाही. उष्णता व आर्द्रता नसल्यामुळे पूर्वमोसमी पावसाचेही वातावरण निर्माण होत नाही. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर.
