आस्था भालके हिचे घवघवीत यश, ९७. २० टक्के गुण घेत केले यश संपादन
लहानपणापासूनच अभ्यासू, मेहनती आणि जिज्ञासू स्वभावाची असलेली आस्था पहिलीपासूनच ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध करत होती. दहावीच्या निकालातही तिने उत्कृष्ट यश संपादन करत शाळेचा गौरव वाढविला आहे. या यशामागे नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वाचे असल्याचे आस्थाने सांगितले. शाळेचे प्राचार्या श्रीमती रेवती भालके व वर्गशिक्षक, शिक्षिका व मैत्रिणीचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे तिने यावेळी सांगितले.
आस्था ही गोकुळनगर परिसरातील नटराज डिटीपी जॉबवर्क सेंटरचे शिवलिंग भालके यांची कन्या असून, तिच्या या यशामुळे कुटुंबासह शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार
आस्था भालके यांचे कौतुक करीत आहे.
