हिंगोलीत महालोक न्यायालयात एकाच दिवशी 100 प्रकरणांचा निपटारा:जलद न्याय मिळाल्याने पक्षकारातून समाधान

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-09t182357590_1778331287.jpg




हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयात आज शनिवार ता. 9 आयोजित महालोकअदालतीमध्ये 100 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये तडजोड होऊन प्रकरणी निकाली निघाली आहेत. हिंगोली जिल्हा न्यायालयातील विधीज्ञ ऍड. सुरेश गडदे यांच्या कार्यालयातील 103 प्रकरणांचा समावेश आहे. या महालोकअदालतीतील सर्वात लक्षवेधी आणि मोठे प्रकरण सय्यद अलमास यांचे ठरले. विशेष म्हणजे, 2025 मध्ये दाखल झालेले हे प्रकरण ऍड. सुरेश गडदे यांच्या पाठपुराव्यामुळे केवळ एका वर्षाच्या आत यशस्वीपणे निकाली निघाले. यामध्ये लिबर्टी जनरल इन्शुरन्स कंपनीकडून 64,00,000 रुपये (64 लाख) इतकी मोठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. अत्यंत कमी कालावधीत मिळालेल्या या मोठ्या दिलाशामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केले. या प्रकरणांच्या यशस्वी तडजोडीसाठी प्रमुख जिल्हा न्यायाधीश टी.एस. अकाली, जिल्हा न्यायाधीश एस.एन. माने, तसेच तदर्थ जिल्हा न्यायाधीश आर.एस. रोटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विविध विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, यामध्ये प्रामुख्याने लिबर्टी जनरल इन्शुरन्सच्या श्रद्धा किनारे, न्यू इंडिया इन्शुरन्सचे अनिल येरेकर, चोलामंडल इन्शूरन्सचे योगेश धसे, ओरिएंटल इन्शुरन्सच्या रमा गरडेकर, रिलायन्स इन्शुरन्सचे चव्हाण, टाटा एआयजीचे आदिनाथ कदम यांनी मदत केली. यावेळी कार्यालयातील सहकारी ऍड. मनीषा गडदे, ऍड. मुद्दाशीर साहेब, ऍड. अर्धापूरकर, ऍड. मस्के, ऍड. जगताप, ऍड. लेकुळे, ऍड. हराळ मॅडम,ऍड.बोरकर ,कापसे ,पृथ्वी आखरे, गुनाराव पोले, कानिफनाथ दिंडे, देवराव कंठाळे, भगवान गडदे, अरविंद गडदे, कृष्णा नरोटे, ओम राऊत, गोपाल गडदे, माऊली गडदे,बाबुराव हराळे, पिनू लोंढे आणि हर्षद शहा यांनी विशेष परिश्रम घेतले. लोकअदालतीमुळे सर्वसामान्यांना दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्तता मिळून त्वरित आर्थिक आधार मिळत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सांघिक परिश्रमातून पक्षकारांना न्याय : ॲड सुरेश गडदे ॲड सुरेश गडदे म्हणाले, एकाच दिवशी 103 प्रकरणांचा निकाल लावणे हे केवळ माझ्या एकट्याचे यश नसून माझ्या संपूर्ण टीमच्या अहोरात्र कष्टाचे फळ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *