विरमगावच्या सरपंच पदी मंगल करपे यांची निवड:एकूण ६०२ मतदानापैकी ३१३ मते मिळाली

0
240_177754701469f3370677a2e_ahhd.jpg




प्रतिनिधी |फुलंब्री नुकत्याच पार पडलेल्या विरमगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत श्री भैरवनाथ शेतकरी ग्राम विकास पॅनलच्या उमेदवार मंगल विश्वनाथ करपे यांनी २६ मतांनी विजय मिळवत सरपंच पदावर ताबा मिळविला. एकूण ६०२ मतदानापैकी त्यांना ३१३ मते मिळाली. विजयानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सोमनाथ करपे, उपसरपंच कारभारी करपे, सुनंदा करपे, वैष्णवी करपे, सविता गायकवाड, भाऊसाहेब कापसे, दत्तू कापसे, भिमाबाई कापसे, धुपाजी कापसे यांच्यासह भाजपचे कृष्णा कापसे, विठ्ठल कापसे, साहेबराव करपे, विठ्ठल उत्तम कापसे यांची प्रमुख उपस्थिती होती. सरपंच मंगल करपे यांनी या विजयाचे श्रेय ग्रामस्थांना देत सर्वांचे आभार मानले. हा विजय माझा नसून गावातील सामान्य जनतेचा आहे. सर्वांना सोबत घेऊन गावाचा शाश्वत विकास करणे हीच माझी पुढील दिशा असेल असे आश्वासन सरपंच मंगल विश्वनाथ करपे यांनी ग्रामस्थांना दिलाच. यावेळी आनंदा करपे, रमेश करपे, बाळू करपे, विजू करपे, आप्पासाहेब करपे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावच्या विकासासाठी कटीबद्द असल्याचे सरपंचांनी सांगितले आहे. नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करताना उबाठा तालुकाप्रमुख सोमनाथ करपे सह ग्रामस्थ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed