Baramati Bypoll Election | बारामतीत एकतर्फी निकालाचं चित्र, सुनेत्रा पवार पहिल्याच फेरीत 6 हजार 500 मतांनी आघाडीवर

0
sayali-web-2026-05-04T094846.405.webp.webp


Baramati Bypoll Election | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच Baramati Bypoll Election ची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याने त्यांच्या विजयाची शक्यता अधिक बळकट झाली आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज अत्यंत भावनिक वातावरणात पार पडत आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुकीचे सुरुवातीचे कल सुनेत्रा पवारांच्या बाजूने दिसत आहे.

मतमोजणीतील महत्त्वाचे मुद्दे:

आज सकाळी ८ वाजल्यापासून एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतदान आणि ईव्हीएम (EVM) च्या पहिल्या फेरीअखेर सुनेत्रा पवार यांनी तब्बल ६,५०० मतांची भक्कम आघाडी घेतली आहे. या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांसह एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, महायुती, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही सामंजस्याची भूमिका घेत सुनेत्रा पवारांना आपला पाठिंबा दर्शवल्याने ही निवडणूक जवळपास एकतर्फी होत असल्याचे चित्र आहे.

सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी, बारामतीची जनता त्यांना किती लाखांचे मताधिक्य देते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पवार कुटुंबासाठी आणि बारामतीच्या जनतेसाठी ही निवडणूक केवळ एक राजकीय लढत नसून, अजित पवारांच्या राजकीय वारशाची भावनिक साद आहे.

मतधिक्याकडे सर्वांचे लक्ष

उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आणि अजित पवारांचा वारसा या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार या निवडणुकीत किती विक्रमी मताधिक्य घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या कलानुसार सुनेत्रा पवारांचे पारडे जड असून, बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed