निवडणूक आयोग हा भाजपचाच मित्रपक्ष:पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी भाजपने विविध हातकंडे वापरले, संजय राऊतांचा आरोप

0
db-temp-cover-marathi-2026-05-04t102631233_1777870649.jpg




पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येत असून, या कलांनुसार भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. या निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शहा यांनी एसआयआरच्या नावाखाली जवळपास ९० लाख मते मतदार यादीतून काढली. ९० लाख मते जेव्हा एकाचवेळेला डिलीट केली जातात. त्याचा परिणाम निकालावर होतो.” असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना राऊत म्हणाले की, “निवडणुकीत तळ ठोकून राहणे हेच मोदी-शहांचे काम आहे. देशात किंवा महाराष्ट्रात मुलींवर अत्याचार होत आहेत. भ्रष्टचार होतोय, महागाई वाढलीये, नोकऱ्या नाही. यासंदर्भात ते तळ ठोकून काम करत नाहीत. पण एखाद्या राज्यात निवडणुका आल्या की, मोदी-शहांचे संपूर्ण सरकार तिथे तळ ठोकून बसते. त्यांना देशाच्या हिताचे आणि विकासाचे फार मोठे काम त्यांच्या दृष्टीक्षेपात असल्याचे मला दिसत नाही,” अशी टीका संजय राऊत यांनी केली. ममता बॅनर्जींच्या ट्विटवर भाष्य ममता बॅनर्जी यांनी निकालाच्या आधी ट्विट करत रात्री वीज घालवणार, त्यामुळे स्ट्राँगरूमच्या बाहेर पहारा द्या. स्ट्राँगरुमबाहेरी सीसीटीव्ही बंद आहेत. त्या परिसरात वाहनांची वर्दळ दिसून आली. तसेच अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झालेला आहे. याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये काहीही होऊ शकते. भाजपला निवडणूक जिंकायची असते. पराभव सामना करावा लागू नये, त्यामुळे जिंकण्यासाठी ते हे सर्व हाथखंडे वापरतात. त्यामध्ये एसआयआर सारखे प्रकार होतात. सीसीटीव्ही गायब करणे, वीज घालवणे, हे सर्व प्रकार घडतात. निवडणूक आयोग हा भाजपचा मित्रपक्ष आहे. त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेला निवडणूक आयोग काहीही करू शकतात.” बारामती-राहुरीच्या निवडणुका केवळ प्रतिकात्मक बारामती आणि राहुरी येथील विधानसभा पोटनिवडणुकांवरही राऊत यांनी मत व्यक्त केले. बारामतीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “या निवडणुका प्रतिकात्मक आहेत. विशेषत: सुनेत्रा पवार यांच्या मतदारसंघात कोणताही प्रमुख निवडणूक लढलेला नाही. काही अपक्ष निवडणुकीला उभे असल्यामुळे तिथे निवडणूक होत आहे.” तर राहुरीच्या निवडणुकीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, “राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला, तर आम्ही त्यांना पाठिंबा दिला. पण शेवटी कर्डिले यांच्या निधनानंतर होत असलेली निवडणूक आहे. त्याचा फायदा त्यांच्या घरातील उमेदवाराला मिळतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed