टाकळी कदीमच्या सरपंचपदी गणेश कसबे यांची लागली वर्णी:विजय मिळवल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण केली

0
default-og-image-mr.jpg



प्रतिनिधी | लासुरस्टेशन टाकळी कदीम ता.गंगापूर येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत गणेश अंबादास कजबे यांनी प्रतिस्पर्धींचा १११ मतांनी पराभव करून सरपंच पदी विजय मिळवल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण केली. टाकळी कदीम येथील प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य पद अतिक्रमणामध्ये अपात्र झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत प्रकाश चंदेल यांचा पराभव करून भगवान भावलाल बढेकर यांचा तीन मतांनी विजयी झाला. टाकळी वाडी येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील पोटनिवडणुकीत चरणसिंग हारसिंग जारवाल यांची बिनविरोध निवड झाली. टाकळी कदीम आणि टाकळी वाडी मिळून असलेल्या गट ग्रामपंचायतीत नऊ सदस्य असून सरपंच पद व प्रभाग क्रमांक एक मधील सदस्य पद २९ ऑक्टोबर २०२४ रोजी या दोघांना अतिक्रमणाच्या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवले होते. त्यामुळे येथील रिक्त झालेल्या जागेवर दि.२८ एप्रिल मंगळवारी मतदान घेण्यात आले. बुधवारी गंगापूर येथे झालेल्या मतमोजणीनंतर निकाल घोषित करण्यात आला. दरम्यान, टाकळी कदीम येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शिवाजीराव चंदेल यांच्या गटातील लोकनियुक्त नवनिर्वाचित सरपंच गणेश कसबे यांनी अटीतटीच्या लढतीत विजयी मिळविला तर चरणसिंग हारसिंग जारवाल यांची देखील बिनविरोध निवड झाली. टाकळी कदीम येथील पोटनिवडणुकीत सरपंचपदी कसबे यांचा विजय झाला. यावेळी जल्लोष करताना चेअरमन शिवाजीराव चंदेल आदी मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed