उन्हामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना‎बसला फटका; लागवड आली धोक्यात‎:पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद परिसरातील चित्र‎

0
240_177754863469f33d5aded86_mirhd.jpg




प्रतिनिधी |पिंपळदरी मिरचीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिल्लोड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विहिरीतील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतकरी उन्हाळी मिरची लागवड करत आहे. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरची लागवड धोक्यात आली आहे. सिल्लोड तालुक्यातील, पिंपळदरी, बाळापूर गोळेगाव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई, जळकी आदी भागातील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करतात. मल्चिंग पेपर शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मल्चिंग पेपरच्या वापरामुळे तणांची वाढ होत नाही. तणांची वाढ होत नसल्याने खर्चात कपात होत आहे. दर्जेदार उत्पादन मिळते. यामुळे उत्पादनाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे दिवसेंदिवस मिरची लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढत आहे. दरवर्षी शेतकरी मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिल अखेर व मे महिन्यात लागवड करत असतो. यावर्षी देखील शेतकऱ्यांनी मिरची साठी पाणी राखून ठेवत मोठ्या प्रमाणात मिरची लागवड केली आहे. परंतु मागील काही दिवसापासून तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने लागवड केलेली मिरचीचे कोवळी रोपे जागीच जळू लागली आहेत. त्यामुळे मिरची उत्पादक बळीराजाला फटका बसत आहे. दीड रुपया रोपाने शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली आहे. त्यात अशाप्रकारे नुकसान होत असल्याने आर्थिक झळ बसू लागली आहे. मिरचीचे रोप वाचविण्यासाठी शेतकरी दिवसांपासून दोन ते तीन वेळा मिरचीला पाणी देऊ लागला आहे. मागील वर्षी अधिक पर्जन्यमानाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. दरम्यान एप्रिल व मे महिन्यात लागवड केलेली मान्सूनपूर्व मिरची जून ते जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तोडणीला येते. दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी देण्याची वेळ सिल्लोडमध्ये मिरची लागवडीला वेग आला आहे. पूर्वी १४०० रुपयांना मिळणारे मल्चिंग पेपरचे एक बंडल आता १८०० रुपयांवर पोचले आहे. याशिवाय खतांच्या किमतींमध्ये प्रति गोणी २०० ते २५० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे मिरची लागवड धोक्यात आली आहे. त्यामुळे मिरची पिकाला दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी देण्याचे काम करावा लागत आहे. पिंपळदरी परिसरात अशा प्रकारे मल्चिंग पेपरवर मिरची पिकाची लागवड करण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed