लातूरमध्ये माणुसकीला काळिमा!:नराधम पित्याचे स्वतःच्याच गतिमंद मुलीवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने प्रकरण उघडकीस

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-03t202128767_1777819924.jpg




महाराष्ट्रात संतापजनक घटनांची मालिका सुरू असतानाच, लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत अमानवी घटना समोर आली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या कृत्यामुळे पितृत्वाच्या पवित्र नात्याला डाग लागला आहे. नसरापूर आणि बीडमधील घटनांनंतर हा घृणास्पद प्रकार समोर आल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या आईने 17 एप्रिल रोजी जळकोट पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र पीडित मुलगी सुमारे 19 आठवडे 2 दिवसांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले. जळकोट पोलिसांनी सखोल तपास करत संशयावरून मुलीच्या वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, स्वतः जन्मदात्या पित्यानेच हे घृणास्पद कृत्य केल्याची कबुली दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जळकोट पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 99/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील विविध कलमे आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पित्याला तातडीने अटक केली असून, या घटनेचा सखोल तपास पोलिस अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे. पुण्यातील धक्कादायक प्रकरण पुण्याच्या नसरापूर परिसरात 1 मे रोजी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली असून, येथे एका 65 वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुरडीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या नराधमाने कृत्यानंतर तिचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. मात्र मुलगी बेपत्ता झाल्याने सुरू केलेल्या शोधमोहिमेत तिचा मृतदेह आढळून आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित आरोपी चिमुरडीला गोठ्याकडे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आल्याने हा क्रूर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed