बलात्कार प्रकरणी फरार आरोपी लातूरमधून अटक:युवतीवर बलात्कार करून छायाचित्रे प्रसारित करण्याची दिली होती धमकी

0
00f688b4-295d-4083-b7f9-8b1085108aeb_1777804792739.jpg




बलात्कार प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला लातूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने एका युवतीवर बलात्कार करून तिची छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली होती. काशीराम चंद्रकांत म्हस्कले (वय २२, रा. हरीओम निवास, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मार्च महिन्यात युवतीने फिर्याद दिल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात म्हस्कलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला असता, आरोपी म्हस्कले लातूरमधील खरबवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला लातूरमधून अटक केली. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास कोडग, सहायक निरीक्षक स्नेहल थोरात, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्यासह पोलीस कर्मचारी मंगेश पवार, सागर बोरगे, मंगेश गायकवाड, महेश बारवकर, किरण साबळे, मितेश चोरमले, नीलेश खैरमोडे आणि अभिनय चौधरी यांनी ही कारवाई यशस्वी केली. गांजा विक्री प्रकरणात एका महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक दरम्यान, पुणे शहरात कोंढवा परिसरात गांजा विक्री प्रकरणात एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २२ किलो गांजा जप्त करण्यात आला. यास्मीन करीम शेख (वय ४५) आणि आमीर समीर शेख (वय १९, दोघे रा. शिवनेरीनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात हे दोघे ओळखीच्या काही जणांना गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे, उपनिरीक्षक अल्फाज शेख, रवींद्र गावडे, प्रवीण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हनुमंत कांबळे आणि विशाल मेमाणे यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed