धिरेंद्र कृष्ण शास्त्रीजींच्या अंधश्रध्देचा प्रसार करणारे देवेंद्र फडणवीस सुध्दा अंधश्रध्दा निर्मुलन कायद्याचे गुन्हेगार आहेत-प्रा.शाम मानव
नांदेड(प्रतिनिधी) -18 एप्रिलपासून अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि संघटक प्रा.शाम मानव हे राज्यभर बुवा तेथे बाया या विषयावर व्याख्यान देत प्रवास करत आहेत. उद्या 4 मे रोजी त्यांचे व्याख्यान नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण सभागृहात सायंकाळी 6 वाजता होणार आहे. याबाबत पत्रकारांशी संवाद साधतांना प्रा.शाम मानव म्हणाले की, आज अंधश्रध्दा वाढविण्याचे काम करणारे नेते अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुध्दा आम्ही धिरेंद्रकृष्ण महाराज(बागेश्र्वर धाम) यांना दिलेल्या आव्हाणाच्या दरम्यान अडचण आणत आहेत. कायदा मी स्वत: तयार केलेला आहे त्यामुळे कोणते काम या कायद्यात गुन्हा ठरते हे मला माहित आहे आणि अंधश्रध्द्ेची भावना पसरविणाऱ्या धिरेंद्रकृष्णजी महाराज यांना घेवून अनेक जागी कार्यक्रम करणे म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी करण्याचे काम नेते मंडळी करत असल्याचा आरोप प्रा.शाम मानव यांनी केला.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रा.शाम मानव यांच्यासोबत सुरेंद्र धुरमुरे, आनंद राऊत, प्रा.इरवंत सुर्यकर, प्रज्ञाधर ढवळे, विठ्ठल भंडारे आणि प्रा.कॉ.उज्वला पडलवार यांची उपस्थिती होती.
उद्या सायंकाळी 6 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात प्रा.शाम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. या संदर्भाने बोलतांना धिरेंद्रकृष्णजी महाराज रामकथा सांगतात यावर माझा आक्षेप नाही कारण तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे. परंतू ज्या पध्दतीचे दिव्यदरबारामध्ये कामकाज चालते. ते सर्व अंधश्रध्दा वाढविण्याचे काम आहे. आम्ही त्यांना दिलेल्या आव्हाणांना त्यांनी स्विकारावे आणि नागपुर पत्रकार भवनामध्ये त्यांच्या झेड प्लस सुरक्षेसह त्यांनी आम्ही दिलेले आव्हाण करून दाखवावे तर आज आम्ही त्यांना 80 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहोत आणि आम्ही दिलेल्या आव्हाणामधील 90 टक्के आव्हाणे त्यांनी सत्य करून टाकली तरी मी त्यांचा भक्त होईल आणि त्यांच्या पायावर डोके ठेवील. या संदर्भाने नागपूर पोलीस आयुक्तांकडे सन 2023 मध्ये आम्ही अर्ज दिला होता आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. परंतू आजच्या परिस्थितीत कोणाला कायद्या लावायचा, कोणाला आत टाकायचे ते मी ठरवेल अशी वृत्ती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. म्हणजे ते सुध्दा धिरेंद्रजी शास्त्रीच्या अंधश्रध्दा पसरविण्याच्या कारभाराला सहाय्य करतात म्हणून ते सुध्दा या कायद्याचे गुन्हेगार आहेत. पण गुन्हा काही दाखल होत नाही.
बुवा तेथे बाया हा विषय स्पष्ट करतांना प्रा.शाम मानव म्हणाले वेगवेगळ्या कारणांमुळे, लहानपणापासून आमच्यावर झालेल्या संस्कारामुळे आम्ही कोठे तरी आपली श्रध्दा गहाण ठेवतो आणि त्यामुळेच अंधश्रध्देचा बळी पडतो. यात महिला अग्रेसर असतात आणि म्हणून अशोक खरातसारखी भोंदू बाबा याचा फायदा घेतात. माझ्यात देव येतो असे म्हणणे गुन्हा होत नाही. माझ्यात दिव्यशक्ती आहे असे म्हणणे गुन्हा होत नाही, इतरांवर कृपा करण्याची क्षमता माझ्यात आहे असे म्हणणारा प्रत्येक व्यक्ती भोंदू बाबाच नव्हे तर तो बदमाश असतो हे सुध्दा त्याच श्रेणीत येतात. मी तयार केलेला कायदा ताकतवार आहे परंतू त्याची अंमलबजावणी मात्र अयोग्य होत आहे हे सांगतांना प्रा.शाम मानव यांनी भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भाने ज्या बातम्यांचे प्रकाशन पत्रकारांनी केले त्यामुळे आता पोलीस बरेच गुन्हे दाखल करत असल्याचे सांगितले.
Post Views: 102
